कर्तव्यांच पालन केल्यास आपला देश प्रगती करू शकतो – युवा उद्योजक रणजीत धस
वडवणी |प्रतिनिधी
वडवणी शहरातील आशीर्वाद ट्रेडर्सचे सर्वेसर्वा ओनर तथा वडवणी कृषी उत्पन्न बाजार समितीचे युवा संचालक रणजीत मधुकरराव धस यांनी नुकताच थायलंड या देशाचा दौरा करून आल्याबद्दल महाराणी ताराबाई विद्यालयात त्यांच्या सत्काराचा कार्यक्रम संपन्न.
याबाबत अधिक माहिती अशी की,युवा उद्योजक रणजीत भैय्या धस यांनी दि.१६ डिसेंबर ते २१ डिसेंबर २०२४ या दरम्यान ब्रिटिश पेंट कंपनीच्या वतीने परदेश दौऱ्यासाठी फुकेट थायलंड या देशासाठी निवड झाली होती तेथील पर्यटन स्थळांना भेटीदेत मायदेशी परतले आहेत त्यांचे परदेशातील अनुभव विद्यार्थ्यांना माहिती व्हावेत यासाठी दि.३१ डिसेंबर २०२४ मंगळवार रोजी त्यांच्या सत्काराचा कार्यक्रमाचे आयोजन महाराणी ताराबाई माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयमध्ये करण्यात आले होते.
या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे संचालक इंजि.अशोक आंधळे तसेच सत्कारमूर्ती युवा उद्योजक रणजीत भैय्या धस, विद्यालयाचे प्राचार्य राऊत सर, उपप्राचार्य मस्के सर,पर्यवेक्षक धाईतिडक सर आदी मान्यवर म्हणून उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी इंजि.अशोक भैय्या आंधळे यांनी अभिनंदन व शुभेच्छापर विचार व्यक्त करताना ते म्हणाले की,व्यवसायाच्या माध्यमातून २० परदेशी दौऱ्या दरम्यान २४ देशांचा दौरा रणजीत भैय्या यांनी केलेला आहे त्यामध्ये ७ वेळा आपल्या आई-वडिलांना परदेश दौऱ्यावर घेऊन गेले आहेत विद्यार्थी मित्रांनो आपण सुद्धा,मेहनत,जिद्द,चिकाटीच्या जोरावर शिक्षणामध्ये यशस्वी व्हावे असे विचार व्यक्त करून परदेश दौरा पूर्ण केल्याबद्दल रणजीत भैय्या यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या. मान्यवरांच्या हस्ते गुलाल,शाल आणि पुष्पगुच्छ देऊन युवा उद्योजक रणजीत भैय्या यांचा सत्कार शिक्षक शिक्षिका यांच्या उपस्थितीत करण्यात आला.
सत्काराला उत्तर देताना सत्कारमूर्ती रणजीत भैय्या धस म्हणाले की,व्यवसायाच्या माध्यमातून दुबई,श्रीलंका,चीन,बँकॉक,सिंगापूर थायलंड यासारख्या २४ देशांचा परदेश दौरा केलेला आहे त्या देशातील स्वच्छता,नियम,इन्फ्रास्ट्रक्चर,पर्यटन स्थळे पाहिल्यानंतर वाटते की आपला देश कुठेतरी पाठीमागे आहे आपण आपल्या कर्तव्यांचे पालन केलं तर आपला देश प्रगती करू शकतो तुम्ही माझा सत्कार या ठिकाणी केला त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो असे ते म्हणाले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे प्राचार्य राऊत सर यांनी केले तर सूत्रसंचालन विष्णू आंधळे सर यांनी केले व उपस्थितांचे आभार श्रीमती चांदेकर मॅडम यांनी मानले.
या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
Discussion about this post