उदगीर/कमलाकर मुळे :
राष्ट्रीय गणित दिवसानिमित्त स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड येथे पोस्टर प्रेसेंटेशन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.या स्पर्धेमध्ये महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालय उदगीर येथील चार विद्यार्थानी सहभाग नोंदविला होता.यात टाकळे नम्रता,बिराजदार स्नेहा,शिंदे आशिष व अरूण मनोहर यांनी सहभाग घेतला होता.बीएससी तृतीय वर्षातील विद्यार्थीनी बिराजदार स्नेहा संजयकुमार यांना प्रथम पारितोषिक व बीएससी प्रथम वर्षातील विद्यार्थी अरूण मनोहर यांना द्वितीय पारितोषिक प्राप्त झाले.संघ प्रमुख म्हणून प्राध्यापक प्रशांत वाघमारे यांनी कार्य केले.या स्पर्धेतील यशस्वी झालेल्या व सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थाचे प्राचार्य राजकुमार मस्के,उपप्राचार्य एस.जी. कोडचे,गणित विभागप्रमुख डाॅ.भालचंद्र करंडे,यासह सर्वानी अभिनंदन केले.
Discussion about this post