


दिवा गणेश नगर येथे गणेशमूर्ती विसर्जन तलाव आहे. तलाव नूतनीकरणासाठी मेसर्स युसीसी इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला एक वर्षामध्ये तलावाचे काम पूर्ण करण्याचे बंधनकारक असून काम पूर्ण करण्यास टोटल ५,७३,२३,८७६/- रुपये ( पाच करोड, त्र्यात्तर लाख, तेवीस हजार, आठशे श्याहत्तर रूपये ) ठरले असुन नियम व अटी पाळून एक वर्षाच्या आत काम पूर्ण करणे बंधनकारक होते परंतु ठेकेदाराने दिलेल्या मुदतीत काम पूर्ण न करता संथ गतीने काम सुरू आहे. ठेकेदाराने कामगारांच्या सुरक्षेसाठी आवश्यक असलेला इन्शुरन्स एक वर्षापूर्वीच संपलेला आहे तसेच काम करते वेळेस एखादी दुर्घटना घडल्यास कामगारांसाठी इन्शुरन्स बंधनकारक आहे परंतु ठेकेदार मनमानी काम करत असून ठेकेदारावर काम पूर्ण करण्यास वचक ठेवण्यास ठाणे महानगरपालिका निष्क्रिय ठरत असून त्यामुळे स्थानिक नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे.
अशा ठेकेदारांना काळ्या यादीत का टाकले जात नाही? व कामात विलंब केल्यामुळे ठेकेदारांवर आर्थिक दंड ठोकावणे गरजेचे आहे अन्यथा काम कधीच पूर्ण होणार नाही. समाजसेवक व माहिती अधिकार कार्यकर्ते नागेश पवार यांनी ठाणे महानगरपालिका आयुक्ताकडे मागणी केली आहे..
Discussion about this post