प्रतिनिधी:- समीर खान
शहरातील जिंतूर रोडवरील उर्दू मदरसा परिसरात परभणी व हिंगोली जिल्ह्याचा दोन दिवसीय तब्लिगी इज्तेमास बुधवार 1 जानेवारी रोजी फजरच्या नमाज नंतर सुरुवात झाली होती आज गुरुवार 2 जानेवारी रोजी रात्री 9 वाजता उपस्थित मोलवींनी विश्वशांतीसाठी सामुहिक दुआ नंतर इज्तेमाची सांगता झाली. परभणी हिंगोली जिल्ह्याच्या तब्लिगी इज्तेमासाठी उर्दू मदरसा परिसरात 80 एकर मध्ये भव्य पेंडॉल टाकण्यात आला होता. यावेळी परभणी हिंगोली जिल्ह्यातील मुस्लिम बांधवांची लाखोंच्या संख्येने उपस्थिती होती.
Discussion about this post