सुशील पवार, डांग
संपूर्ण गुजरातमध्ये च नाही परंतु सम्पूर्ण भारत मध्ये सुरू होणार मकर संक्रांतीचा सण हा पशू-पक्ष्यांचा जीव घेणारा सण बनवू नये, असे आवाहन डांग जिल्हा पोलिसांनी केले आहे. पतंगाच्या तारेमुळे कोणाचाही जीव धोक्यात येणार नाही, याची काळजी घेण्याची विनंती डांग जिल्हा पोलिसांनी केली आहे, विशेषत: उत्तरायण सणात पतंगाच्या घातक तारेमुळे मनुष्याबरोबरच पशु-पक्ष्यांचाही जीव जातो. पोलिसांनी त्यांच्या संदेशात म्हटले आहे की, “प्राणी आणि पक्षी लाचार आहेत पण आपण नाही. मकर संक्रांत हा जीवनाचा उत्सव साजरा करणारा सण आहे, त्याला जीव घेणारा सण बनवू नका”.डांग पोलीस
Discussion about this post