कोकण हे कला आणि साहित्य यामध्ये अग्रेसर आहे,.बरेच साहित्यिक, कलाकार हे याच मातीने घडवलेत. याच कारण म्हणजे त्यांची मेहनत, चिकाटी आणि सातत्य.असच एक भजन क्षेत्रातील कोकण रत्न म्हणजे भजन सम्राट श्री.विजय परब बुवा.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड-मुटाट गावातील हे थोर व्यक्ती महत्त्व. कै. श्री. परशुराम पांचाळ बुवा यांचा गुरू म्हणून परब बुवांना उत्तम सहवास लाभला. त्यांनी ही पुरेपूर फायदा करून भजन क्षेत्रात आपला ठसा उमटवला.त्यामुळे सध्याच्या घडीला पहाडी आवाजाचा बादशाह असा नावलौकिक आहे. बुवांनी बरेच शिष्य घडलेत आणि अजून ही कार्य चालू आहे.
१ जानेवारी २०२५ रोजी बुवांचा ७५वा जन्मदिन होता. याच क्षणाच अवचित्य साधून शिष्होता तर्फे आपल्या गुरू विषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी कासार्डे येथील रूक्मिणी मंगल कार्यालय येथे अमृतमहोत्सवी जन्मदिन सोहळा आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्यासाठी संपूर्ण जिल्ह्यातील तसेच बाहेरील देखील भजन क्षेत्रातील मंडळी उपस्थित होती.
या कार्यक्रमासाठी नामवंत, कोकण रत्न आणि जेष्ठ-श्रेष्ठ असे भजनी बुवा व पखवाज वादक म्हणजे श्री. श्रीधर मुणगेकर, श्री.भगवान लोकरे, श्री. चिले बुवा, श्री.लक्ष्मण गुरव, श्री, प्रमोद हर्यान, श्री.राऊळ बुवा , पं.माऊली सावंत,श्री.आनंद मोर्ये, श्री. मारूती मेस्त्री, श्री. पाटकर, श्री. मोहन मेस्त्री, श्री. हेमंत तवटे,सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नामवंत समालोचक श्री.राजा सामंत इ. मान्यवर तसेच सर्व कुटुंबीय उपस्थित होते.
सर्व मान्यवरांनी आपल्या गायन – वादनातून बुवांना शुभेच्छा दिल्या.
परब बुवांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्यासाठी सिंधुदुर्गाच तरूण तडफदार नेतृत्व मत्स्य व बंदरे विकास मंत्री मा. श्री.नितेशजी राणे साहेब यांनी देखील कार्यक्रम स्थळी हजेरी लावली. सोबत कणकवली माजी सभापती श्री.मनोज रावराणे, तालुका अध्यक्ष (ग्रामीण) श्री.दिलीप तळेकर, माजी उपसभापती श्री. संतोष कानडे इ. उपस्थित होते.अशा या महोत्सवाची सांगता मृदंगाचार्य पं. श्री. माऊली सावंत यांच्या पखवाज एकल वादनाने झाली.
Discussion about this post