सिंगल यूज प्लास्टिक विक्रीवर बंदी असतानाही त्याची विक्री होत असल्याचे कुपवाड विभागीय कार्यलयाचे सहायक आयुक्त सचिव सागावकर यांच्या निदर्शनास आल्याने आयुक्त शुभम गुप्ता यांच्या आदेशानुसार आज सहा आयुक्त सांगावकर यांनी वरिष्ठ स्वच्छता निरीक्षक अनिल पाटील आणि स्वच्छता निरीक्षक विकास कांबळे , सिद्धांत ठोकळे यांच्या सहकार्याने प्रभाग समिती 03 मध्ये सिंगलयुज प्लास्टिक तपासणी जप्ती व दंडात्मक कारवाई ची धडक मोहीम हाती घेतली यामध्ये एकूण 15 आस्थापनाची तपासणी करण्यात आली तसेच 5 आस्थापनांना प्रत्येकी पाच हजार प्रमाणे एकूण 25 हजार रुपये इतका दंड वसूल करण्यात आला. या मोहीममध्ये वरिष्ठ स्वच्छता निरीक्षक अनिल पाटील, स्वच्छता निरीक्षक विकास कांबळे , सिद्धांत ठोकळे, गणेश धोतरे, अंजली कुदळे , मुकदम सागर मद्रासी यांनी सहभाग घेतला. यापुढेही सिंगल यूज प्लास्टिक विक्री करणाऱ्या आस्थापनांनवर कडक कारवाई सुरूच राहील असा इशाराही आयुक्त शुभम गुप्ता यांनी दिला आहे.
Discussion about this post