०३/०१/२०२५
उमरी तालुका”
शिक्षणाच्या स्वर्गाचे, जिने उघडले दार ….
तीच सावित्री,
आज जगाची शिलेदार..,.
आज क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या निमित्ताने साजरा होणारा बालिका दिन जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रामखडक येथे अतिशय उत्साहाच्या वातावरणात साजरा करण्यात आला.



महिलांच्या शिक्षणाची ज्योत पेटविणारी, भारतातील पहिली महिला शिक्षिका आणि मुख्याध्यापिका, आजीवन आपल्या पतीचे सामाजिक कार्य आपल्या खांद्यावर वाहून नेणारी, साहित्यातील बावनकशी रत्न क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली.
या निमित्ताने सर्वप्रथम सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे सरपंच सौ ज्योतीताई गोरठकर व शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री लक्ष्मण पाटील शिंदे यांच्या हस्ते पूजन करण्यात आले.
नंतर विद्यार्थिनींची भाषणे झाली. त्यानंतर माता पालकांच्या गटांसाठी येणाऱ्या आयडिया व्हिडिओतील काही कृती या दिवसाच्या निमित्ताने शाळेमध्ये मातांच्या कडून प्रत्यक्ष करून घेण्यात आल्या .यामध्ये सर्व मातांनी अतिशय उत्साहाने सहभाग नोंदवला. अतिशय खेळीमळीच्या व आनंदाच्या वातावरणात हा बालिका दिन रामखडक शाळेत संपन्न झाला.
यावेळी शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष ,सदस्य, सरपंच , श्री परमेश्वर पा.गोरटकर, उपसरपंच,अनुसया बाई देविदास जाधव,श्री शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष,बाबुराव गोविंदराव शिंदे (स्वस्त धान्य दुकानदार) शुभांगी ताई तुकाराम शिंदे अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस,आशा वर्कर,व गावातील महिला,पालक सहभागी झाले होते.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक श्री अहिरे सर तसेच सहशिक्षक श्री टेकाळे सर यांनी परिश्रम घेतले. शेवटी सर्वांना स्नेहभोजन देऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
Discussion about this post