खोपोली / मानसी कांबळे :- खोपोली नगर परिषदेमध्ये कै. सुधाकर दामु जाधव, कै. हरिभाऊ गोविंद शिंदे व अशोक गणपत पवार हे सफाई कामगार या पदावर कार्यरत होते. अशोक गणपत पवार हे नगर परिषद सेवेतून सेवानिवृत्त झालेले आहेत. तसेच कै. सुधाकर दामु जाधव, कै. हरिभाऊ गोविंद शिंदे हे सेवेत असतांना मृत्यू पावलेले आहेत.
शासन धोरणानुसार व लाड समितीच्या शिफारशीनुसार संबंधित सफाई कामगारांच्या जागी त्यांच्या वारसाची नियमानुसार सफाई कामगार या पदावर नियुक्ती देण्यात येते. त्यानुसार खोपोली नगर परिषदेचे मुख्याधिकारी डॉं. पंकज पाटील यांनी दि. 1 जानेवारी 2025 रोजी कर्मचारी यांच्या वारस अमित अशोक पवार, राज हरिभाऊ शिंदे व लवकेश सुधाकर जाधव यांना वारसाहक्काने सफाई कामगार या पदावर नियुक्ती दिली. यावेळी खोपोली नगर परिषदेचे उपमुख्याधिकारी रणजित पवार हे उपस्थित होते. या नियुक्तीबाबत कर्मचारी व त्यांच्या कुटुंबियांनी मुख्याधिकारी डॉं. पंकज पाटील यांचे आभार मानले.
Discussion about this post