भारत कवितके मुंबई कांदिवली पश्चिम.
सांगोला येथील दैनिक तुफान क्रांती चे संपादक मिर्झा गालिब मुजावर यांची पत्रकार सुरक्षा समिती पश्चिम महाराष्ट्र संघटक पदी निवड झाली.आपल्या दैनिकातून ते नेहमी वंचित पिडीत घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न करत असतात.सामाजिक बांधिलकी ची जाणीव ठेवून लेखणीच्या माध्यमातून समस्या मांडतात, दैनिकातून फक्त लिखाण करून ते थांबत नाही तर ती समस्या सोडविण्यासाठी वेळप्रसंगी उपोषणाला ही बसतात व समस्या सोडवितात, एक मयत झालेल्या व्यक्तीला राशन दुकानांतून गेली अनेक वर्षे शासनाच्या फुकट योजनेचा फायदा होतो,व धान्य मिळते,हे कसे? याबाबत संपादक मिर्झा गालिब मुजावर येत्या एक दोन दिवसात आंदोलन सुरू करणार आहेत.आजची पत्रकारिता पैसे कमवायचे साधन झाले आहे परंतु याला मात्र दैनिक तुफान क्रांती अपवाद आहे, अजून त्यांना गालबोट लागले नाही.असे आमचे मुंबई प्रतिनिधी भारत कवितके यांनी सांगितले आहे.संपादक मिर्झा गालिब मुजावर यांचे सर्व थरातून अभिनंदन सह शुभेच्छा चा वर्षाव होत आहे.
Discussion about this post