
January 4, 2025
Team Monday To Monday
जळगाव /यावल, प्रतिनिधी l
वाळू उपसा मुळे नदीपात्रात पडलेल्या खड्ड्यांचा अंदाज न आल्या मुळे यावल येथील प्रौढाचा गिरणा नदी मार्गे पत्नीसह जात असताना मृत्यू झाल्याची घटना दि. ४ जानेवारी शनिवार रोजी दुपारी ३ वजेच्या सुमारास घडली.
अधिक माहिती अशी की, यावल येथील पांडुरंग नामदेव मराठे (वय ५९, रा. शिवाजीनगर, यावल) हे एरंडोल तालुक्यातील खर्ची येथून लमांजन येथे नातेवाईकांकडे पत्नीसह गिरणा नदीमार्गे जात असताना नदीतील खड्ड्यांचा अंदाज न आल्याने बुडून त्यांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शनिवारी दि. ४ रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास घडली आहे..
Discussion about this post