
“मानोरा तालुका अध्यक्ष श्री नितीन चगदळ सर ह्यांच्या मार्गदर्शनाखाली मा.मुख्यमंत्री साहेब यांना निवेदन”
मानोरा प्रतिनिधी / विशाल मोरे..
मानोरा:- मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी योजने अंतर्गत मानोरा तालुक्यातील सर्व शासकीय आस्थपनेवर रुजू असलेल्या प्रशिक्षणार्थी शिक्षक व शिक्षीका ह्यांचा कार्यकाकळामध्ये वाढ करावी अशी मागणी मानोरा तालुका अध्यक्ष श्री नितीन चगदळ सर ह्यांच्या मार्गदर्शनाखाली मा.तहसीलदार साहेब मानोरा तथा मा.गटशिक्षणाधिकारी साहेब पंचायत समिती मानोरा ह्यांच्या मार्फत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा.देवेंद्रजी फडणवीस साहेब ह्यांना मानोरा तालुक्यातील युवा प्रशिक्षणार्थी शिक्षक ह्याच्या वतीने निवेदन देण्यात आले.
मा.तहसीलदार साहेब मानोरा तथा मा.गटशिक्षणाधिकारी साहेब पंचायत समिती मानोरा ह्यांच्या यांच्यामार्फत मा.मुख्यमंत्री साहेब ह्यांना दिलेल्या निवेदनात नमुद केले आहे की, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी योजना राज्य पातळीवर मोठ्या प्रमाणात सुरु केल्याने मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजने अंतर्गत आम्ही सर्व शिकाऊ प्रशिक्षणार्थी शिक्षक-शिक्षिका म्हणून मानोरा तालुक्यातील विविध विभागात शासकीय कार्यालयातील आस्थापनेवर आमची प्रशिक्षणार्थी शिक्षक म्हणून निवड केली आहे.
सर्व प्रशिक्षणार्थी शिक्षक व शिक्षिका हे आगस्ट किंवा सप्टेंबर २०२४ पासून रुजू झालेले आहेत. परंतु कालावधी हा फक्त ६ महिन्याचा असून तो फेब्रुवारी २०२५ मध्ये पूर्ण होत असून आम्ही पुढील ६ महिन्यानंतर करणार तरी काय? असा प्रश्न आम्हा सर्व प्रशिक्षणार्थी शिक्षकांना पडला आहे.
कायमस्वरुपी रोजगार मिळावा यासाठी कार्यकाळ व मानधन वाढवून द्यावे, अशी मागणी मानोरा तालुका अध्यक्ष श्री नितीन चगदळ सर तथा मानोरा तालुक्यातील युवा प्रशिक्षणार्थी शिक्षकांच्या वतीने मा.तहसीलदार साहेब मानोरा तथा मा.गटशिक्षणाधिकारी साहेब पंचायत समिती मानोरा ह्यांच्या यांच्यामार्फत मा.मुख्यमंत्री साहेब ह्यांना निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदन देतेवेळी मानोरा तालुक्यातील युवा प्रशिक्षणार्थी मोठ्या प्रमाणात उपस्थितीत होते. मानोरा तालुका उपाध्यक्ष श्री पंकज तायडे सर, सचिव सौं मेघा भगत, कोषाध्यक्ष श्री धिरजकुमार ठाकरे, संघटक श्री संदीप कडबे, सोशल मीडिया प्रमुख श्री निखिल दुमारे, श्री बजरंग भालदांड, सौं.रुपाली अस्वार, सौं.दिपाली गावंडे, कु.दिव्यांनी मनवर, सौं.तेजस्विनी गावंडे, कु.कांचन पवार, सौं.सोनू पिसे, सौं.दिक्षा सोनोने, कु.प्रांजली हरिभाऊ इंगोले, श्री आकाश काटकर, श्री सुधीर इंगळे, मो.सोहेल रशीद, श्री सतीश राठोड, श्री पवन पिंगाणे, श्री राहुल वारे, श्री रणजित परांडे, सौं.संगीता घोरसडे, सौं.शालु चव्हाण इत्यादी युवा प्रशिक्षणार्थी शिक्षक व शिक्षिका निवेदन देते वेळी उपस्थित होते..
Discussion about this post