देशभरातून लाखो अनुयायींची मानवंदनेसाठी उपस्थिती
रवींद्र पवार
तालुका प्रतिनिधी शिरूर
पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील ऐतिहासिक कोरेगाव भिमा (पेरणे फाटा) येथे २०७ वा शौर्यदिन कार्यक्रम मोठ्या उत्साहाने शांततेत साजरा करण्यात आला.या शौर्यदिनाच्या कार्यक्रमाला ऐतिहासिक विजयस्तंभाला अभिवादन व मानवंदना देण्यासाठी देशभरातून लाखोंच्या संख्येंने भीम अनुयायी उपस्थित होते.यावेळी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
शौर्यदिन व विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमासाठी कोरेगाव भिमा (पेरणे फाटा) येथे दरवर्षी १ जानेवारी रोजी मोठ्या प्रमाणावर लाखोंच्या संख्येंने भीम अनुयायी दरवर्षी येत असतात.यंदा नविन वर्षाची सुरूवात होत असताना विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी राज्यभरातून आणि परराज्यातून लाखो भीम अनुयायी दाखल झाले होते.विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी ३१ डिसेंबर पासूनच मोठी गर्दी विजयस्तंभावर पहायला मिळाली.
राज्यातील वेगवेगळ्या भागांतून अनुयायींनी अभिवादन करण्यासाठी व मानवंदना देण्यासाठी ऐतिहासिक विजयस्तंभ याठिकाणी लाखोंच्या संख्येंने हजेरी लावली होती.याप्रसंगी विविध सामाजिक संघटना व संस्था यांच्यावतीने अनुयायी यांना मोफत चहा,पाणी,नाष्ट्यासह भोजनदानाचे वाटप करण्यात आले.दरम्यान,अनुयायांची वाढती संख्या लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने विविध सुविधा उपलब्ध करून दिल्या होत्या.याप्रसंगी अनुचित घटना टाळण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
कोरेगाव भीमा विजयस्तंभ अभिवादन सोहळ्यासाठी ३१ डिसेंबर आणि १ जानेवारी असे दोन दिवस देश आणि राज्यभरातून लाखो अनुयायी येणार असल्याने,त्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाकडून अनुयायांसाठी मोफत बससेवा,आरोग्य सेवा,स्तनदा मातांसाठी हिरकणी कक्ष,ज्येष्ठांसाठी निवारा कक्ष,शौचालय सुविधा,निवारा कक्ष,पिण्याचे पाणी,पोलीस मदत कक्ष,वाहनतळ आदी सुविधा उपलब्ध करून दिल्या होत्या.
Discussion about this post