
सोलापूर – महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री नामदार बाळासाहेब पाटील हे रविवारी सोलापूर दौऱ्यावर आले असता त्यांचे स्वागत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाच्या वतीनं करण्यात आला. दरम्यान याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रदेश उपाध्यक्ष तथा जिल्हा नियोजन समितीचे विशेष निमंत्रित सदस्य किसन जाधव, सोलापूर शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहर जिल्हाध्यक्ष संतोष पवार, राष्ट्रवादी युवक प्रदेश सरचिटणीस चेतन नागेश गायकवाड, प्रांतिक सदस्य महेश निकंबे, शहर उपाध्यक्ष उमेश जाधव, किरण शिंदे, राष्ट्रवादी शहर सरचिटणीस निलेश कांबळे, विनायक लिगरकर, शहर सचिव अमोल जगताप, शहर संघटक माणिक कांबळे, ऋषी येवले, वसंत कांबळे, दीपक आर्गील, महादेव राठोड आदींच्या प्रमुख उपस्थिती होते.

दरम्यान राज्याचे नवनिर्वाचित सहकार मंत्री बाळासाहेब पाटील हे सोलापूर दौऱ्यानिमित्त आले असता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष तथा जिल्हा नियोजन समितीचे विशेष निमंत्रण सदस्य किसन जाधव आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहर जिल्हाध्यक्ष संतोष पवार यांनी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांचे स्वागत करीत शाल, मखमली टोपी, मोठा पुष्पहार आणि ब्रह्मांडनायक श्री स्वामी समर्थ महाराजांची प्रतिमा देऊन त्यांचे स्वागत करून शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी इच्छा भगवंताची मित्र परिवाराचे सदस्य आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आदींची उपस्थिती होती.
Discussion about this post