सारथी महाराष्ट्राचा वैजापूर तालुका प्रतिनिधी अनिल सूर्यवंशी
शिर्डी येथील हॉटेल शांती कमल च्या सभागृहात महाराष्ट्र राज्य कौशल्य व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण मंडळाच्या मान्यता प्राप्त संस्थांचे राज्यस्तरीय अधिवेशन पार पडले या अधिवेशनास राज्यातील संस्थाचालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या अधिवेशनास राज्यातील संस्थांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या सातही संघटनांचे अध्यक्ष व इतर पदाधिकारी उपस्थित होते . कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान सातही संघटनांच्या अध्यक्षांनी भूषवले,
सदर कार्यक्रमात संस्थाचालकांनी ट्रेड वाईजविविध अडचनी वर मनोगत व्यक्त केले.
सदर अधिवेशनात संस्था चालवत असताना येणाऱ्या अडीअडचणी तसेच त्या अडीअडचणींवरती उपाय याविषयी साधक-बाधक चर्चा झाली
सदर अधिवेशनात सर्वानुमते सर्व संघटनांची एक सुकाणू समिती स्थापन करून इथून पुढील लढा त्या सुकाणू समितीमार्फत लढण्याचे ठरवले, तसा ठराव करण्यात आला.
तसेच फी वाढ, बृहत् आराखडा, संस्था रिन्यूअलची फी वाढ, रिन्यूअल चा कालावधी, तसेच मंडळाच्या अभ्यासक्रम MSCVT मध्ये समाविष्ट करणे त्याना NSQF लेवल लागू करणे.
बांधकाम पर्यवेक्षक केलेल्या विद्यार्थ्यांना ठेकेदारी लायसन ची मर्यादा वाढवून देणे इलेक्ट्रिशियन ट्रेड च्या विद्यार्थ्यांना महापारेषण महावितरण राज्य परिवहन मंडळ इत्यादी स्थापनेत रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे,
टायपिंग संदर्भात मंत्रालयात असणारे काही महत्त्वाचे विषयावर तोडगा काढणे तसेच मंडळाच्या अभ्यासक्रमांना शासकीय शिष्यवृत्ती मिळवून देणे आधी 17 वेगवेगळे ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आले ,
सदर अधिवेशनात श्री.भैय्यासाहेब पाटील , श्री .सुहास जी पाटील ,श्री मुबारक बेग, डॉ.गौरव चोथे पाटील, श्री मारुती ढोबळे , श्री पठाण गफ्फार खान . श्री शरद अंदुरे आदींनी आपले अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले. तसेच श्री.समाधान जाधव पाटील यांनी हम सब एक हे… असे म्हणत सर्वांचे आभार मानून कार्यक्रमाचा समारोप केला.
हे अधिवेशन यशस्वी करण्यासाठी अहिल्यानगर संयोजन समितीतील श्री संतोष पालवे, श्री गणेश नागरे, श्री रफिक जी शेख, श्री डॉ महेश शेजुळ, श्री.डॉ गौरव चोथे-पाटील,श्री लक्ष्मण साळुंखे, श्रीमती अश्विनी खेडकर, श्री हरीश लुकड, श्री.समाधान जाधव,श्री शशिकांत धनवटे, श्री सोमनाथ जानराव, श्री.पठाण सर श्री तनपुरे सर इत्यादी संस्थाचालकांनी विशेष प्रयत्न केले.
Discussion about this post