सोयगाव
येथील जिल्हा परीषद प्राथमिक शाळा रामजीनगर येथे सोयगाव तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी रंगनाथ आढाव व सोयगाव केंद्राचे केंद्र प्रमुख फिरोज तडवी याच्या मार्गदर्शनाखाली शाळेचे मुख्याध्यापक किरणकुमार पाटील व शिक्षक यानी शाळेतील विद्यार्थ्याना व्यवहारीक ज्ञान मिळावे, प्रत्यक्ष व्यवहार करता यावा या उद्देशाने शाळेमध्ये बाल आनंद मेळावा उत्साहात घेण्यात आला.
मेळाव्याचे उदघाटन सोयगाव शहराच्या नगराध्यक्षा आशा तडवी, आमखेडा संरपंच गजानन ढगे, केंद्रीय मुख्याध्यापक मोतीराम जोहरे, समाजसेवक राजू कुडके, शंकर जेठे,झगाजी पोतरे याच्या शुभहस्ते करण्यात आले.
या आनंद मेळाव्यात विद्यार्थ्यानी वेगवेगळ्या खाद्य पदार्थ,वेगवेळी फळे,कडधान्य, भाजीपाला याचे स्टॉल लावले होते.या बाल आनद मेळाव्यास आमखेडा शाळेच्या मुख्याध्यापक सविता पाटील, कामिनी बोरसे यानी विद्यार्थ्यासह भेट देऊन खरेदी केली. याच बरोबर पालक पार्वताबाई कुडके,मनिषा जेठे,वैशाली इगळे, एकनाथ इगळे,दत्तात्रय जोहरे, शरद पवार, अनिल ठोबरे, रघुनाथ इगळे, आशा इगळे याच्यासह अनेक पालकानी, उपस्थित मान्यवरानी विद्यार्थ्याकडून वस्तुची खरेदी करून त्याना व्यवहारिक ज्ञानाचा प्रत्येक्ष अनुभव दिला. या बाल आनंद मेळाव्यात जवळपास १९८७ रुपयाची वस्तूची खरेदी विक्री झाली.व्यवहारिक ज्ञानाचे प्रत्येक्ष अनुभवाचा आनंद विद्यार्थ्याच्या चेहर्यावर दिसून येत होते.
बाल आनंद मेळवा यशस्वीतेसाठी शाळेचे मुख्याध्यापक किरण पाटील, शिक्षक गोपाल चौधरी, प्रशिक्षित शिक्षक शुभम देसले यांनी परिश्रम घेतले.
फोटो ओळ: सोयगाव – जिल्हा परीषद प्राथमिक शाळा रामजीनगर येथे बाल आनंद मेळाव्यात खरेदी करतांना पालक
Discussion about this post