
लोणार ता प्रतिनिधी:-सुनिल वर्मा 05/01/2025आज दिनांक 5 जानेवारी 2025 रोजी अहिल्यानगर (अहमदनगर) चे शरदचंद्रजी पवार राष्ट्रवादी गटाचे नवनिर्वाचित खासदार खासदार निलेशजी लंके यांचे पत्रकार दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमानिमित्त मेहकर शहरात आगमन झाले असता त्यांनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस तथा श्री संत गजानन महाराज मंदिर येथे आले असता त्यांचा लोणार शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष शेख समद शेख अहमद बुलढाणा जिल्हा काँग्रेस कमिटीचे माजी जिल्हा सरचिटणीस साहेबराव पाटोळे, माजी नगराध्यक्ष भूषण मापारी, माजी उपनगराध्यक्ष बादशाह खान, यांनी शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ, देऊन सत्कार केला यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस श्याम भाऊ उमाळकर,मेहकर विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना उबाठा गटाचे नवनिर्वाचित आमदार सिद्धार्थजी खरात, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते भास्करराव काळे,शिवसेना उबाठा चे उपजिल्हाप्रमुखआशिष रहाटे, गजानन तात्या कृपाळ, ,बुलढाणा जिल्हा काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस कलीमखान, महाराष्ट्र प्रदेश सेवा दल चे सरचिटणीस शैलेश बावस्कर,माजी नगरसेवक संजय म्हस्के,उस्मान शहा, मेहकर पंचायत समितीच्या माजी सभापती सागर पाटील,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुका अध्यक्ष दत्ता घनवट, प्रा.संजय वानखेडे,सुनील अंभोरे,युनुस पटेल, तारीक खान,रियाज कुरेशी, छोटू गवली, प्रदीप देशमुख ॲड.विजू मोरे यांच्यासह अनेक मान्यवर नेते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते
Discussion about this post