प्रतिनिधी:- गणेश वाडेकर
बोरगाव मंजू येथील परशुराम नाईक विद्यालयात जिल्हा विधी सेवा प्राधिकरणच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी कायदेविषयक मार्गदर्शन कार्यशाळा झाली. मुख्याध्यापक मनोज आगरकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यशाळेला जिल्हा दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर, सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण योगेश पैठणकर, बोरगाव मंजूचे निरीक्षक अनिल गोपाळ, विधी सेवा कार्यालयाचे मुख्य लोक अभिरक्षक अॅड. नितेंद्र उंबरकर, सहाय्यक लोक अभिरक्षक अॅड. अक्षय डोंगरे, अॅड. सुमेध डोंगरदिवे, उपमुख्याध्यापक गजानन उपस्थित होते.
Discussion about this post