विद्यार्थी गुणवत्ता वाढीसाठी उंदरगाव जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळेतील मुख्याध्यापक नंदकिशोर कापसे सर व त्यांची टीम सर्वतोपरी प्रयत्न करत असते,विद्यार्थ्यांना वेगवेगळे अनुभव देऊन सर्वांगीण शिक्षण पूर्ण करण्याकडे सर्व शिक्षकांचा भर असल्याचे शाळा व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष बालाजी नाईकवाडे यांनी व्यक्त केले .ते आज उंदरगाव येथे संपन्न झालेल्या बाल आनंद बाजाराच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते.
चिमुकले मोठ्याने ओरडून भाजी विकत होते,आठवडी बाजाराचा आनंद घेत होते. मेथी पालक, कोथिंबीर, चाकवत , शेपू इ. पालेभाज्या ; गावरान वांगी ,टोमॅटो, दुधी भोपळा, बटाटे, कोबी , तुरीच्या शेंगा,हिरव्या मिरच्या इत्यादी फळभाज्या ; पेरू ,केळी इ. फळे तर खाऊ गल्ली मध्ये समोसे, पावभाजी ,वडापाव ,पॅटीस ,अप्पे , चहा विकून चिमुकल्यांनी१२५०० रुपये विक्री केल्याचे शिक्षकाकडून सांगण्यात आले. शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा रेशमाताई मोहन नाईकवाडे यांचे हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. या उपक्रमाला सहकार्य करण्यासाठी शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य पूजा समाधान आरे , शिवगंगा नाईकवाडे, नमिता सुतार, मनीषा कोळी, प्रियंका आरे, माधुरी नाईकवाडे ,प्रगती मस्के,युवराज लटके, सुधीर चव्हाण, यशवंत आरे, तसेच रेश्मा चव्हाण, प्रहार चे जिल्हा समन्वयक पंडित साळुंखे, विष्णू सुतार विद्यार्थ्यांचे पालक ग्राहक म्हणून उपस्थित होते. बाल आनंद बाजार यशस्वीपणे पार पाडण्यासाठी कुमुदिनी गिड्डे -कापसे मॅडम ,बिपिन कदम सर ,धोंडीराम कांबळे सर ,धन्यवाद शिंदे सर यांनी बाल आनंद बाजाराचे योग्य रीतीने नियोजन केले होते. गावचे सरपंच राजाभाऊ लवटे, उपसरपंच समाधान मस्के तसेच दारफळ केंद्राचे केंद्रप्रमुख फारुख शेख सर यांनी वैशिष्ट्यपूर्ण उपक्रमाबद्दल उंदरगाव शाळेचे व शाळा व्यवस्थापन समितीचे कौतुक केले.
सारथी महाराष्ट्राचा
सोलापूर जिल्हा प्रतिनिधी
सोपान चंद्रकांत चव्हाण
Discussion about this post