दौंड तालुका प्रतिनिधी -दौंड तालुक्यातील पोलीस प्रशासन, सार्वजनिक बांधकाम, नगरपालिका व इतर शासकीय विभागांच्या अधिकाऱ्यांची आढावा बैठक दौंड तालुका आमदार राहुल दादा कुल यांच्या उपस्थितीमध्ये पार पडली.
यावेळी दौंड तालुक्यातील प्रस्तावित, मंजूर व प्रगतीपथावर असलेल्या कामांची समीक्षा करण्यात आली तसेच विकास कामे व शासकीय योजनांच्या आढावा घेण्यात आला. यावेळी कामे वेळेत पूर्ण करण्याचे, मंजूर कामांबाबत संबंधित विभागाशी पाठपुरावा करण्याचे व विविध प्रस्तावित कामांचा आराखडा तयार करण्याचे व कामे विहित वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश उपस्थित अधिकाऱ्यांना आमदार राहुल कुल यांनी दिले.
यावेळी माजी नगराध्यक्ष श्री. प्रेमसुखजी कटारिया, गटविकास अधिकारी श्री. प्रशांत काळे, दौंडचे उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. बापूराव दडस, दौंडचे पोलीस निरीक्षक श्री. गोपाळ पवार, यवतचे पोलीस निरीक्षक श्री. नारायण देशमुख, उपभियांता सार्वजनिक बांधकाम इमारती विभाग श्री. हरीश्चंद्र माळशिकारे, नायब तहसीलदार श्रीम. ममता भंडारे, यांच्यासह दौंड नगरपालिका, दौंड आरोग्य विभाग, वन विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
दौंड तालुका प्रतिनिधी -कानिफनाथ मांडगे 98 90 95 41 32


Discussion about this post