भारत कवितके मुंबई कांदिवली पश्चिम.
रविवार दिनांक ५ जानेवारी २०२५ रोजी दुपारी १२ वाजता मलकापूर येथील तालुका शिक्षक संघ, पतसंस्था सभागृह, भ्रातृ मंडळ समोर, चाळीस बिघा, मलकापूर या ठिकाणी माणुसकी मल्टीपर्पज फाऊंडेशन मलकापूर आयोजित राष्ट्रभक्ती सेवा गौरव पुरस्कार २०२५ सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करुन आलेल्या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.यावेळी प्रमुख पाहुणे विडंबन कवी संजय आहेर यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की ” सामान्यांच्या दृष्टीने साहित्यिक हे वेडे असतात.साहित्य हे समाजाला सक्षम सुदुढ मार्गाने चालण्याचे साधन आहे.साहित्याची समाजाला गरज आहे.देश विकसित होण्यासाठी अशा पुरस्काराची गरज आहे.हा कार्यक्रम संख्यात्मक दृष्टीने जरी कमी असला तरी गुणात्मक आहे.आभासी दुनियेत सत्य, सुसंस्कृत पणा कुठं आहे? समाजातील वास्तव साहित्यात मांडले पाहिजे.आपले साहित्य समाज हित साधणारे असावे.” यावेळी माणुसकी मल्टीपर्पज फाऊंडेशन च्या वतीने सूत्रसंचालक बाळासाहेब गिरी यांनी अध्यक्ष विवेक राजापुरे यांच्या कार्याचा गौरव करुन महिला सक्षमीकरण, बेरोजगारांना रोजगार,५० बेरोजगारांना रोजगार दिला.अनेक वेळा समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या कार्याची दखल घेऊन पुरस्कार सोहळा चे आयोजन केले,अशा अनेक कार्याचा आढावा घेतला.तर मान्यवरांच्या हस्ते मुंबई कांदिवली पश्चिम येथील पत्रकार साहित्यिक गीतकार सामाजिक कार्यकर्ता भारत कवितके यांना आदर्श साहित्य रत्न पुरस्कार २०२५ देऊन गौरविण्यात आले.कार्यक्रमाचे अध्यक्ष वसंत पाटील यांनी पुरस्कारार्थींचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.यावेळी महाराष्ट्र राज्यातील ३० पुरस्कार प्राप्त साहित्यिक, शिक्षक, सामाजिक कार्यकर्ता अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांचा राष्ट्रभक्ती पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.यामध्ये साहेबराव नंदन, सुभाष उमरकर, संग्राम आंद्रे,पारुल राठोड,सह इतर पुरस्कारर्थी उपस्थित होते.तर फाऊंडेशनचे अंशु श्रीवास्तव, विवेक सोनावणे व इतर कार्यकर्ते यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.


Discussion about this post