सांगली मिरज कुपवाड शहर महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन अंतर्गत तीनही शहराच्या कचरा संकलन केल्या जाणाऱ्या जागा या वर्षानुवर्षे कचऱ्याचे ढीग साठून असायच्या मिरज बेडग रस्त्यावर वड्डी हद्दीमध्ये मिरजेचा कचरा संकलित केला जातो
तसेच सांगली आणि कुपवाड चा कचरा हा समडोळी रस्त्यावर असलेल्या संकलन केंद्रात संकलित होतो. गेली वर्षे या दोनही ठिकाणी कचरा संकलित होत आहे मात्र योग्य नियोजन नसल्याने या कचऱ्याचे ढीग साठून भटक्या कुत्र्यांचा उपद्रव वाढला होता आणि दुर्गंधी पसरल्याने या संकलन केंद्राच्या आजूबाजूच्या आरोग्याचा धोकाही वाढला होता मात्र काही महिन्यांपासून या दोन्ही ठिकाणी महापालिका प्रशासनाने अत्यंत नेटके नियोजन करून कचऱ्याचे भस्मीकरण सुरु केले आणि या ठिकाणी देवराई निर्माण केली गेली आज या दोनही जागांवर कचरा डेपो आहे याचे अस्तित्व जाणवत नाही मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवडीमुळे या जागांचे नंदनवनच झाले आहे. याबाबत आयुक्त शुभम गुप्ता म्हणाले. “कचरा मुक्त शहर करण्यास प्रशासन बरोबर नागरिकांचा ही सहभाग असणारच आहे. नागरिक हे शहराच्या चांगल्या बदलाचे शिल्पकार असतात ,यावर माझा विश्वास आहे, तो खरा ठरणार आणि भविष्यात देवराई हे पर्यटन स्थळ म्हणून विकसित करण्याकडे आम्ही लक्ष केंद्रित करणार आहोत”
या दोन कचरा संकलन केंद्रांच्या आजूबाजूच्या पंचक्रोशीतील गावांनी या कचऱ्याबाबत अनेक तीव्र आंदोलने मोर्चे जन आंदोलने करून आगडोम उसळलेला होता .आज याच गावातील लोक प्रशासनाचा अजोड कामगिरीचे तोंड भरून कौतुक करून मानसन्मान देऊन हे केलेल्या मेकओव्हर बद्दल धन्यवाद देत आहेत . या मानवनिर्मित नंदनवन होण्यासाठी अनेक जणांचे हात लागले आहेत सफाई कामगार ते कुटुंब प्रमुख म्हणून आयुक्त यांनी मनापासून हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केलेले आहेत .यामध्ये तात्कालीन आयुक्त नितीन कापडणीस आणि सुनील पवार यांनी सुरुवात करून दिली. बेडग रोड कचरा डेपो येथे कचरा – ३,१३,८२१ mt
समडोली रोड येथील कचरा डेपो वरील ६,६५,२८४ mt एकूण ९,७९,१०५ mt कचरा मुक्त परिसर झाला आहे .
आता जबाबदारी मोठी आणि महत्वाची समजून आयुक्त शुभम गुप्ता (IAS) यांनी कचरा मुक्त झालेल्या जागा त्या वर दैनंदिन गोळा होणारा कचरा वर प्रक्रिया करण्या करिता नवीन प्रकल्प उभा करण्या साठी प्रयन्त चालु केले आहेत आणि ते वेळेत कार्यरत होईल असे नियोजन देखील केले आहे.
या प्रकल्पाचा वेळ निश्चित करून काम चालू केले आहे, यश नक्की येणार पण साथ नागरिकांची असावी अशी अपेक्षा देखील व्यक्त केली आहे.
आता नागरिकांनी आपला कचरा हा दोन भागात ओला आणि सुका करून देण्याचे कर्तव्य करावे लागेल त्या नंतर प्रशासन आपले पुढील कामकाज करणार आहेत.
जुन २०२४ पासून प्रकल्प कार्यरत होऊन दैनंदिन कचरा देखील मार्गी लागणार आहे .
बांधकाम व पाडकाम कचरा प्रक्रिया प्रकल्प. तसेच मृत जनावर क्रेमेटर, डॉग पाँड, वीड तो वेल्थ, असे विविध प्रकल्प प्रस्तावित करण्यात येत असून कचरा मुक्त शहर म्हणून सांगली मिरज आणि कुपवाड महापालिका नावारूपाला येणार आहे. त्यास साथ असणार आहे ती सर्व सांगली मिरज आणि कुपवाड मधील सुज्ञ नागरिकाची
Discussion about this post