प्रतिनिधी:-तेलंगे सिद्धेश्वर.
लातूर:-भारतातील पहिल्या स्त्री शिक्षिका, मुख्याध्यापिका,थोर समाजसेविका, शिक्षणाची ज्योत तेवत ठेवणाऱ्या,कवयित्री,क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती हरंगुळ येथील स्प्रिंग डेल पब्लिक स्कुलमध्ये साजरी करण्यात आली.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष नरसिंग आयलाने, सचिव विनोद जटाळ उपस्थित होते.सर्वप्रथम सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण केले. त्यानंतर शाळेतील श्रेयश वाघमरे, वरद वाघमारे, भूमी आयलाने, प्रांजल फुलमंटे, आस्था शेळके, माही आयलाने या विद्यार्थ्यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर प्रकाश टाकला.
तसेच यांच्या जयंतीचे औचित्य साधून बालिका दिन साजरा कारण्यात आला.यावेळी शाळेतील अंकिता पांचाळ, स्वानंदी खरोसे, रुद्रायणी वाघमारे, आराध्या उडगे, परेदी उडगे, शरण्या एकलारे या विद्यार्थिनींनी सावित्रीबाईची वेशभूषा परिधान केले.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष नरसिंग आयलाने आपल्या भाषणातून वरील विद्यार्थ्यांचे कौतुक करून सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर प्रकाश टाकला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचलन प्राचार्य चव्हाण यांनी केले तर आभार प्रदर्शन शाळेच्या समन्वयक राजश्री आयलाने यांनी केले. यावेळी शाळेतील सहशिक्षक खोत, भोसले, तेलंगे महिला शिक्षिका शुभांगी फुलमंटे, कीर्ती वाघमारे अपेक्षा उटगे यांनी सहकार्य केले.

Discussion about this post