
मानोरा / कांरजा प्रतिनिधी / विशाल मोरे..
मानोरा : पोलिस स्टेशन कारंजा शहर येथे दि.03/01/2025 रोजी फिर्यादी लवलेश दशरथ कोडापे वय ४२ वर्ष रा. खेर्डा जिरापुर यांनी जबानी रिपोर्ट दिला की, त्याची पत्नी नामे सौ. सोनू कोडापे ही दुपारी १२/०० वा बकऱ्या चारण्याकरीता जंगलात गेली असता कोणीतरी अज्ञात आरोपीने धार धार शस्त्राने मानेवर वार करून जिवाने ठार मारले आहे अशा रिपोर्ट वरून पो. स्टे, कारंजा शहर अप.क.०४/२५ कलम १०३ (१) भा. न्या. सं प्रमाणे अज्ञात आरोपी विरूध्द गुन्हा दाखल झाला असुन गुन्हयाचे गांभीर्य पाहुन मे पो.नि.सा. यांनी तात्काळ तपास पथक नेमुण घटनास्थळी भेट दिली असता घटनास्थळावर मृतक महीला नामे सौ. सोनु लवलेश कोडापे वय ३३ वर्ष रा. ग्राम खेर्डा जिरापूरे ता. कारंजा जि. वाशिम हीचा मृतदेह हा खेर्डा जिरापुरे जंगल वन परीसरात बंदी मध्ये जमीनीवर पडलेला दिसला. तिचे मानेवर व पाठीवर धार धार शश्त्राने वार केल्याचे दिसत होते परंतु सदर खुन कोणी केला या बाबत कोणताही सुगावा लागत नव्हता व खुन कोणी केला व कोणत्या कारणाने झाला या बाबत कोणत्याचा प्रकारची माहीती मिळत नव्हती तसेच घटनास्थळावर वन बंदी परीसरामध्ये आरोपी व हत्यार सश्त्र याचा कसोशिने शोध घेतला तसेच गावामधील लोकांना विचारपुस करण्यात आली. परंतु गुन्हया संबंधाने कोणत्याच प्रकारची माहीती मिळत नव्हती गोपनिय माहीतील्या आधारे समजले की, गुन्हा घडला तेव्हा पासुन गावातील संदिप गायकवाड हा फरार आहे वरून संदीप गायकवाड याचे घरावर लक्ष ठेवले व त्यांचे घरातील व्यक्तीचे मोबाईल नंबर घेवुन पाळत ठेवुन त्याचा फोटो प्राप्त केला. दि.०५/०१/२५ रोजी माहीत गोपनिय माहीती मिळाली की, संदीप गायकवाड हा मुंबई ला पळुन जाणार आहे. अशी माहीती मिळाल्याणे आम्ही सापळा रचुन संदीप गायकवाड यास शीताफीने नांदुरा रेल्वे स्टेशनच्या बाहेर त्याला पकडले त्याला गुन्हया संबंधाने विश्वासात घेवुन विचार पुस केली असता त्याने सांगीतले की, नमुद गुन्हा करते वेळी ग्राम खेर्डा जिरापुरे येथील किशोर ऊर्फ बाबु देवराव कोवे हा माझे सोबत होता आम्ही दोघांनी तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला परंतु नकार दिला व गावात तुमचे नाव सांगतो असे म्हटल्याने आरोपीतांनी संगनमत करुन सौ. सोनु लवलेश कोडापे हीस विळ्याने मानेवर मारुन जिवाने ठार मारले दोन्ही आरोपीतांना ताब्यात घेण्यात आले व त्यांनी गुन्हयाची कबुली दिल्याने त्यांना पो. स्टे कारंजा शहर येथे अटक करण्यात आली आहे.
सदर ची कार्यवाही मा. पोलीस अधिक्षक वाशिम श्री अनुज तारे साहेब अपर पोलीस अधिक्षक श्रीमती लता फड मँडम, उपविभागिय पोलिस अधिकारी प्रदिप पाडवी, पोलिस निरिक्षक दिनेशचंद्र शुक्ला यांचे मार्गदर्शनात सपोनि पवन राठोड, परी. पोउपनि गजानन पबे पोहेका गणेश जाधव, मयुरेश तिवारी, उमेशकुमार बिबेकर, पोकाँ नितीन पाटील, अनिस निन्सुरवाले. यांनी केली असुन पुढील तपास सपोनि पवन राठोड हे करीत आहे..
Discussion about this post