गडचिरोली :
गडचिरोली येथील रामनगर वार्डातील रहिवासी अयांश अभय लिंगायत २ वर्षे २ महिन्यांच्या
चिमुकल्याने इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स कडून ‘IBR अचिव्हर’ हा मानाचा किताब मिळवत नाव उज्ज्वल केले आहे. २९ जून २०२२ रोजी जन्मलेल्या आयांशने १२ स्वातंत्र्य सैनिक, ४ राष्ट्रीय प्रतीके, १३ देशांचे झेंडे, शरीराचे १८ अवयव, ३५ पक्षी, ११ कीटक, ११ वाहने, १२ पेये, ३९ प्राणी, १८ भाजीपाला, १० आकार, आणि १२ समुद्री प्राणी ओळखून दाखवले आहेत.
त्याने २८ भारतीय राज्यांची राजधानी पाठ केली असून १ ते २० पर्यंत मोजणी सुद्धा अचूकपणे करतो. इंग्रजी अक्षरमाला संबंधित शब्दांसह सादर करण्याची त्याची क्षमता त्याच्या भाषिक कौशल्यांना अधोरेखित करते. अयांश १६ इंग्रजी बालगीते आणि ८ मराठी बालगीते सहजपणे म्हणतो.
अयांशला इतरांपेक्षा वेगळं बनवते ती त्याची जिज्ञासा आणि शिकण्याची उत्सुकता, जी त्याच्या पालकांनी उत्तम प्रकारे जोपासली आहे. त्याची आई चांदनी लिंगायत, आणि वडील, डॉ. अभय लिंगायत यांनी त्याच्या प्रारंभिक विकासामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्सने १७ सप्टेंबर २०२४ रोजी त्याच्या यशाला अधिकृत मान्यता दिली.
अयांशची कहाणी अनेक पालक आणि लहान मुलांसाठी प्रेरणादायक ठरली आहे. योग्य वेळी ओळखले गेलेले आणि जोपासले गेलेले कौशल्य, यश मिळवून देऊ शकते, हे त्याने सिद्धकेले आहे. त्याच्या या कामगिरीमुळे गडचिरोली जिल्ह्याचा अभिमान वाढला असून, देशातील मुलांना त्यांच्या क्षमता शोधण्यासाठी प्रेरणा मिळाली आहे.
त्याचा स्वतःचा एक यूट्यूब चॅनेल
AAL Creation by Chandani https://www.youtube.com/@aalcreationbychandani2000 या नावाने आहे आणि 2600 च्या वर सदस्य आहे, जिथे त्याच्या विविध उपक्रमांचे आणि यशाचे दर्शन घडते..
Discussion about this post