
✒️ पियूष गोंगले गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी ✒️
संपर्क 📲9423170716
मुलचेरा _;आज दिनांक ९-१-२५ रोज गुरुवारला भगवंतराव माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, गोमणी येथे पहिली महिला मुस्लिम शिक्षिका फातिमा शेख यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक भगवंतराव हायस्कूल च्या शिक्षिका कु. लैजा चालूरकर यांनी केले.
कार्यक्रमात भगवंतराव हायस्कूल गोमणी चे मुख्याध्यापक/प्राचार्य डॉ. संजय भांडारकर, ज्येष्ठ शिक्षक श्री आनंदराव अलोणे व श्री रेवनाथ लांजेवार यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाला भगवंतराव हायस्कूल व उ.मा.वि. गोमणी चे शिक्षक श्री चुडाराम भेंडारकर, युवराज पथाडे, श्री आनंदराव निखाडे, श्री बंडू ताजणे, श्री रेवनाथ लांजेवार, कु. लैजा चालूरकर, तसेच भगवंतराव हायस्कूल व उ.मा.वि. गोमणी चे वर्ग ८ ते १२ चे विद्यार्थी उपस्थित होते.
अध्यक्षांच्या परवानगीणे कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला..
Discussion about this post