
दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संघ नाशिक च्यावतीने पत्रकार दिनी ज्ञानेश्वरी क्रीडा व सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष प्रकाश वाघ यांना राष्ट्रीय कर्मयोगी पुरस्कार देवुन सन्मानित करण्यात आले. होरायझन सीबीएससी शाळा, नाशिक येथे पत्रकार दिनाच्या पुर्व संध्येला हा पुरस्कार सोहळा संपन्न झाला. या सोहळयासाठी मा श्री कमलेशजी सुतार (झी २४ तास), डाॅ भारती चव्हाण (गुणवंत कामगार कल्याण मंडळाच्या अध्यक्षा), श्री महेंद्र देशपांडे (राष्ट्रीय अध्यक्ष- बी जे पत्रकार संघ), डाॅ ज्योती केदारे (मिसेस मलेशीया इंटरनॅशनल), ओमप्रकाश रावत (रोटरी क्लब अध्यक्ष नाशिक), सौ निशीगंधा कापडणीस (मिसेस युनिवर्स इंटरनॅशनल २०२४), दिनकरजी शिलेदार (संपादक-छंद दिवाळी अंक) आदी मान्यवर उपस्थित होते.
ज्ञानेश्वरी क्रीडा व सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष प्रकाश वाघ यांनी कोविड-१९ च्या काळात केलेल्या सामाजिक कार्याची दखल घेवुन त्यांना हा राष्ट्रीय कर्मयोगी पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यांच्या यशाबाबत विविध मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले आहे..
Discussion about this post