
नागपूर : आदिवासी विकास विभाग, महाराष्ट्र शासन आयोजित राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धा नागपूर येथे पार पडली. या स्पर्धेत तवा आश्रमशाळेतील तीन विद्यार्थ्यांनी आपल्या क्रीडा कौशल्याने घवघवीत यश संपादन केले.
कुणाल महेंद्र मातेरा
गोळाफेक प्रकारात 17 वर्ष वयोगटात चौथा क्रमांक पटकावला.
नितेश विष्णू मेरे
600 मीटर धावण्यात 14 वर्ष वयोगटात दुसरा क्रमांक मिळवला तर भावेश संजय
विघ्ने 14 वर्ष वयोगटात कबड्डीमध्ये उल्लेखनीय कामगिरी बजावली.
या क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन आदिवासी विकास मंत्री मा. अशोक उईके यांच्या हस्ते करण्यात आले.
स्पर्धेचा समारोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.
विद्यार्थ्यांनी केलेल्या यशस्वी कामगिरीमुळे तवा आश्रमशाळेचे नाव उज्ज्वल झाले असून, त्यांचे कौतुक सर्व स्तरातून होत आहे. त्यांच्या मेहनतीला आणि प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाला यश मिळाल्याचे प्रतिपादन शाळेच्या मुख्याध्यापकांनी केले.
या यशामुळे आदिवासी विद्यार्थ्यांच्या क्रीडा क्षमतेवर प्रकाश पडला असून, अशा प्रकारच्या स्पर्धा त्यांना प्रोत्साहन देण्यास महत्वाची भूमिका बजावतात..
Discussion about this post