सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेच्या नियोजन शून्य कामकाजाबद्दल नागरिकांना अनेकवेळा प्रत्यय आलाय. सध्या सर्वत्र घरपट्टी आकारणीचा कळीचा मुद्दा बनला असतानाच कुपवाड हद्दी मधील एका निवासी इमारतीच्या पूर्णत्व दाखल्यासाठी विकासकाने ऑनलाईन पद्धतीने अर्ज केला असता ऑनलाईन प्रणालीमध्ये घरपट्टी आणि पाणीपट्टी ना हरकत दाखल्याची मागणी केली गेली त्यानंतर विकासकाने रीतसर कुपवाड विभागीय कार्यालयामध्ये कर अधीक्षक विभागाला अर्ज हि केला महापालिका घरपट्टी विभागाचे कर्मचारी त्या बांधकाम स्थळावर पोहोचले त्यांनी एकूण २० सदनिका असलेली ती इमारत मोजून घरपट्टी आकारणीची केली आता पुढे तर या विभागाने प्रत्येक सदनिकेची घरपट्टी भरल्याशिवाय तुम्हाला एन ओ सी देता येणार नसल्याचे स्पष्टच केले मात्र अजूनही या इमारतीचा पूर्णत्व दाखल हातात नसताना किंवा अजूनही बांधकाम कामे शिल्लक असतांना आणि कोणीही सदनिका धारक या इमारती मध्ये राहायला गेलाही नसताना अशी आकारणी केलेली रक्कम कशी भरून घेऊ शकता अशी शंका या विकासकांनी विचारली तर या कार्यालयाचे कर अधीक्षक मोहन कलंगुटगी यांनी सांगितले कि तत्कालीन आयुक्त नितीन कापडणीस यांनी त्यावेळी काही नियम लागू केले होते त्यामुळे आज नवीन इमारतीच्या सदनिकांचे काम जरी सुरु असले तरीही घरपट्टी आकारली जाते मात्र जरी अजून पूर्णत्वाचा दाखलाच मिळाला नाही आणि सदनिका विक्रीही झाली नाही तरीही प्रत्येक सदनिकेला घरपट्टी कशी आकारली जाऊ शकते याबाबत मनपा प्रशासनातील एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले कि हा प्रकार अजब आहे तत्कालीन आयुक्तांनी तसा आदेश काढला आहे तसाच हा आदेश रद्द करण्याचा अधिकारही आता आयुक्तांकडे आहे त्यामुळे नाईलाज पूर्णत्व दाखल्यासाठी घरपट्टी भरूनच ना हरकत दाखल घ्यावा लागेल. मात्र यामुळे विकासकांना नाहक भुर्दंड आहे. कारण अजून कोणतीही सदनिका विक्री झाली नसल्याने हि घरपट्टी रक्कम सध्या तरी विकसकाला स्वतः च्या खिशामधून भरावी लागेल. महापालिकेने आपली तिजोरी भरण्यासाठी नागरिकांना वेठीस धरण्याचा हा प्रकार सुरु केला आहे. अजूनही नवीन सदनिकांना सोइ सुविधाही मिळत नाहीत तोपर्यंत घरपट्टी का भरायची हा हि एक नवीन सवाल नागरिकांमधून विचारला जात आहे.
Discussion about this post