महापालिकेच्या कुपवाड विभागीय कार्यालयातील नगररचना विभागातील अभियंता आझम जमादार यांना कधी खुर्चीवर पाहिल्याचे कुणाला आठवते का ? असा एक प्रश्न एका नागरिकाने काही वेळापूर्वी विचारला तर या कार्यालयांमधील कर्मचाऱ्याने हि खुर्ची कायम रिकामी असते ते फोनही कधी उचलत नाहीत असाच इथला कारभार असल्याचे बोलून दाखवले अनेक नागरिकांच्या यापूर्वीही तक्रारी या खुर्ची बाबत झाल्या मात्र महापालिकेने नेहमी प्रमाणे अपुऱ्या मनुष्य बळाचे कारण देत या गोष्टीवर पडदा टाकला मात्र नागरिकांच्या खिशातील पैशातून गलेलठ्ठ पगार घेऊनही हे अधिकारी असे वागू कसे शकतात हा एक संशोधनाचा मुद्दा आहे. आता किस्सा असा झाला श्रीमती सावंत यांची एक गुंठेवारी नियमितीकरणाची एक फाईल गेलं काही महिने झाले या आझम जमादार यांच्या कडे प्रलंबित आहे. या महिलेने पैसेही भरले आहेत मात्र या या महिलेची तक्रार आमच्याकडे आल्यावर आमच्या प्रतिनिधींनी आझम यांच्याशी संपर्क केला फोन न उचलण्याचं प्रत्यय आम्हालाही आला त्यानंतर नाईलाज आमच्या प्रतिनिधींनी त्यांना मेसेज केला त्यानंतर त्यांचा फोन आला कि काय काम आहे सांगा त्यानंतर या महिलेच्या तक्रारीवरून पैसे भरल्याची पावती त्यांना पाठवली त्यावर फाईल शोधून ठेवतो दोन दिवसांनी संपर्क करा असा फोन झाला त्यानंतर दोन नाही तर चार दिवस गेले परत आम्ही याना संपर्क केला परत फोन न उचलण्याचे या महाशयांनी काम सुरु केले त्या नंतर आमच्या प्रतिनिधींनी हि फाईल जिथे ठेवली गेली होती त्याचा शोध घेतला असता त्यांच्या सोमरील कपाटामध्ये हि फाईल होती मेसेज वरून या महाशयांनी सांगितले कि फाईल मिळाली आहे आता बघून घेतो मात्र आज अखेर या फाईल चा विषय काही मार्गी लागला नाही. अशा प्रकारे नागरिकांची अवहेलना होत असेल तर मग या अधिकाऱ्यांनी त्यांची खुर्ची रिकामी का करू नये असा संतप्त सवाल संबंधित महिलेने विचारला यावर आता आम्हीही निरुत्तर झालो. प्रशासन काळातही असे अधिकारी निर्ढावलेले आहेत आता तरी काही महिने राहिले आहेत आयुक्त शुभम गुप्ता यांनी अशा अधिकाऱ्यांना शिस्त लावण्याचे काम करावे हि माफक अपेक्षा नागरिक करू शकतात.
Discussion about this post