नळदुर्ग येथील कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात वाचन संकल्प महाराष्ट्राचा उपक्रम २०२५ हा महाविद्यालयात ग्रंथालय विभागाच्या वतीने मोठ्या उत्साहात राबविण्यात आला.
ग्रंथालयाच्या वतीने सर्वांसाठी ग्रंथालयातील दुर्मिळ व महत्वपूर्ण ग्रंथाचे प्रदर्शन भरविले होते. त्याचे उदघाटन श्रीम कमल नलावडे यांच्या हस्ते झाले. तर ग्रंथदिंडीचे व ज्ञानेश्वरी ग्रंथाचे पुजन डॉ. सुलभा देशमुख यांनी केले. प्राचार्य डॉ. सुभाष राठोड हे अध्यक्षस्थानी होते. यावेळी प्रा. रणजित दांगट, डॉ . सुभाष जोगदंडे, डॉ. दिपक जगदाळे, अधिक्षक धनंजय पाटील, प्रा. संगीता मोरे, प्रा. झरीना पठाण यांची प्रमुख उपस्थिती होती.
विद्यार्थ्यावर उत्तम संस्कार करण्यासाठी ग्रंथ मोलाची भुमिका बजावतात असे मत प्राचार्य. सुलभा देशमुख यांनी व्यक्त केले.
महाविदयालयाच्या प्रांगणात ग्रंथदिंडी काढून वाचन संस्कृती रुजविण्याचा प्रयत्न करण्यात आला. प्राचार्य डॉ. सुभाष राठोड यांनी अंत:करणाच्या शुद्धीकरणासाठी ग्रंथ वाचणे अतिशय गरजेचे आहे. विद्यार्थ्यानी मोबाईलच्या दुनियेत हरवून जाण्यापेक्षा पुस्तकाच्या दुनियेत हरवून जावे म्हणजे पाहिलेले स्वप्न सत्यात उतरू शकते असे विचार मांडले. यावेळी निबंध स्पर्धेचेही आयोजन केले होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. सुभाष जोगदंडे यांनी केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालान डॉ. संतोष पवार तर आभार डॉ. सचिन देवव्दारे यांनी मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री. दत्तात्रय कांबळे, श्री. सचिन गायकवाड, श्री. भिमराव गवारे, श्री. मधुकर माने यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमास प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्याप्रमाणात उपस्थित होते.
Discussion about this post