साई श्रद्धा पालखी चे संस्थापक अध्यक्ष माननीय श्री चंदू भाऊ साडे हे गेल्या 19 वर्ष पासून या पालखीचे आयोजन करत आहेत याही वर्षी नवीन नवीन जिवंत देखावे व कलाकार वाद्य पथक या
पालखीचे वैशिष्ट्य आहे.
नाशिक साई श्रद्धा पालखी फाउंडेशन शोभायात्रा सोहळा मंगळवारी 7 जानेवारी 2025 नाशिक रोड येथे आनंद उत्सव असंख्य साई भक्त नागरिक सहभागी झाले होते.
या कार्यक्रमासाठी सटाणा येथील प्रसिद्ध देव मामलेदार ब्रास बँड पथक आणि उत्तर भारतातून आलेली देवी देवतांचे वेशभूषा केलेली कलाकार यांनी कार्यक्रमाची शोभा वाढवली ही पालखी पाहण्यासाठी प्रचंड जनसमुदाय शहरातील विविध भागातून येऊन गर्दी करतात.
पालखी अध्यक्ष श्री. प्रकाश भाऊ साडे. उपाध्यक्ष श्री. आकाश भाऊ महाजन. आयोजक कुणाल भाऊ कोठवदे. तसेच राज निकाळे अमोल पारख नंदू साडे मंगेश लांडगे यांनी सर्व पालखीचे नियोजन केले.
कार्यक्रमात विविध क्षेत्रातील मान्यवरांनी व राजकारणी मान्यवरांनी साई पालखीचे दर्शन घेतले. तसेच शहर वाहतूक पोलिसांनी सहकार्य केले.
Discussion about this post