प्रतिनिधी सुरेश मनोहर सुराशे
आज दिंडोरी तालुक्यातील श्री स्वं किसनलालजी बोरा इंग्लिश मीडियम स्कूल वणी येथे ५२वे जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले . या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून ना अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ साहेब यांच्या हस्ते संपन्न झाले , अध्यक्षस्थानी दिंडोरी लोकसभेचे खासदार भास्कर भगरे साहेब होते.नंतर नंतर सर्व मान्यवरांचे स्व . श्री. किसनलालजी बोरा इंग्लिश मीडियम स्कूल वणी यांच्यातर्फे सत्कार करण्यात आला.व नंतर कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.व नाशिक जिल्ह्यातील सर्व शाळेचे विद्यार्थ्यांनी आपले विज्ञान प्रकल्प व केलेले प्रोजेक्ट यावेळी मंत्री महोदयां समोर सादर केले हे प्रदर्शन तीन दिवस चालणार आहे. यावेळी आपण आणलेले उपक्रमाची माहिती मुलांनी मंत्री महोदयांना समजून सांगितले यात टाकाऊ पासून टिकाऊ, कमी पाण्यात कशी शेती करता येईल, पर्यावरणाचे रक्षण कसे करण्यात येईल, असे अनेक प्रकारचे प्रकल्प विद्यालय प्राथमिक शाळेचे विद्यार्थी आलेले होते
यावेळी ना . मंत्री नरहरी झिरवाळ साहेब. दिंडोरी लोकसभेचे खासदार भास्कर भगरे व कादवा कारखान्याचे चेअरमन श्रीराम शेटे. कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन श्री प्रशांत आप्पा कड वणी गावचे सरपंच श्री मधुकर भरसट, उपसरपंच विलास कड सर्व ग्रामपंचायत सदस्य ,शिक्षण विस्तार अधिकारी व जिल्हा विज्ञान अध्यापक संघाचे सर्व पदाधिकारी सर्व जिल्हातील शिक्षक व किसन लालजी बोरा इंग्लिश मीडियम स्कूल चे चेअरमन श्री महेंद्र शेठ बोरा, रविभाऊ सोनवणे, राजूभाऊ गोतरणे, माजी पंचायत समिती सदस्य विलास निरगुडे , सप्तशृंगी पतसंस्थेचे चेअरमन सचिन खाबिया, सर्व पत्रकार बांधव व महिला भगिनी वणी गावचे ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
Discussion about this post