वडवणी प्रतिनिधि,
दरवर्षीप्रमाणे याही वर्षी पिंपळारुई येथे गैबीसाहेब पीर देवस्थान जत्रा महोत्सव ८ जानेवारी पासून संदल मिरवणूक करून सुरू झाला होता तर ९ तारखेला कंदोऱ्या व ताजी जत्रा भरली होती. १० जानेवारी शुक्रवार रोजी कुस्त्याचे आयोजन करण्यात आले होते. एक रुपयापासून ते पाच हजार एक रुपयापर्यंत कुस्त्या लावण्यात आल्या. यामध्ये वडवणी तालुक्यातील व बीड जिल्ह्यातील गावागावातून पेहलवान आले होते. बाळू आवारे पाटोदा, जालिंदर मुंडे आबा कोल्हापूर, मनोहर कसबे बाहेगव्हाण जिवाची वाडी, होळ, चिखलबीड , चिंचवडगाव, बाहेगव्हाण, खडकी, दहीफळ, परळी या गावातील पेहलवानांनी उपस्थिती लावली होती.
जिवाची वाडी येथील बाळासाहेब चौरे व पाटोदा येथील अभिषेक निराळे या दोघांच्या कुस्ती वर गावातील प्रेक्षकांनी अकरा हजार रुपये लावले होते ही कुस्ती अतिशय देखणी व डोळ्याचे पारणे फेडणारी ठरली. तसेच संभाजीनगर येथील महिला पट्टू रेवती व राजस्थान येथील महिला पट्टू किरण या महिलेच्या कुस्तीने सर्वांचे लक्ष वेधले होते. शेवटी नेकनुरचा आतिफ शेख पेहलवान व पिंपळा येथील पांडू पैलवान या दोघांची तर जालिंदर मुंडे यांचा पट्ट्या सुरज मुंडे व आष्टीचा मनोज पवार पैलवान अशा शेवटच्या दोन कुस्त्या प्रत्येकी पाच हजार रुपये इनाम देऊन लावल्या गेल्या या सर्व कुस्त्यांची नियोजन करण्यासाठी गावातील पंच कमिटी दिवसभर मेहनत घेत होती तसेच गावातील सर्व लहानथोर मंडळी व परिसरातील मंडळी उपस्थित होते.
यावेळी रामधन आंधळे, महादेव आंधळे, धनंजय आंधळे सर, विष्णुपंत आंधळे, विनायक आंधळे, लक्ष्मण आंधळे, विलासराव आंधळे, दिनकर भाऊ आंधळे, डॉ. मारोतराव आंधळे, भाऊसाहेब आंधळे, श्रीमंत पाटील, गोविंदराव आंधळे, अभिजित आंधळे, पप्पू आंधळे शिवाजीराव आंधळे माणिकराव खाडे, बालासाहेब आंधळे, मुबारक शेख, शौकत शेख, ईनुस शेख, आलुभाई शेख, बंडू भांगे, बबनराव भांगे, विलास शिंदे सर, गोकुळनाना पडघण , रावसाहेब आंधळे उपसरपंच, सुमंत आंधळे, बालु आंधळे, रामेश्वर आंधळे, अमोल आंधळे, तर तुळशीदास आंधळे, सज्जन आंधळे व सरपंच केशवराव आंधळे यांनी आर्थिक नियोजन केले. या कुस्त्यांची दंगल पाहण्यासाठी हजारो च्या संख्येने लोक उपस्थित होते.
Discussion about this post