साकोळ डिजीटल शाळेची आशा पूर्ण केली पहिली वर्गातील भालके या चिमुकल्यानी …
प्रतिनिधी /शिरूर अनंतपाळ(वाल्मीक सूर्यवंशी.)
शिरूर आ. तालुक्यातील साकोळ येथील इयत्ता पहिल्या वर्गात शिकत असलेल्या माधव भीमाशंकर भालके या बालकांनी आपल्या पालकाकडे डिजीटल शाळा करण्याचा हट्ट धरून इयत्ता पहिलीच्या वर्गाची वडिलांकडून रंगरंगोटी करून घेऊन स्वतःचा वर्ग ई लर्निग बनवल्याबद्दल त्याचे व त्यांच्या पालकांचे सर्वत्र कौतुक होत आहे.जिल्ह्यात दोन नंबरची तर तालुक्यात एक नंबर असलेली, जिल्हा परिषदची शाळा साकोळ येथे आहे . शासनाच्या ई लर्निग योजनेंतर्गत तालुक्यातील ब-याच शाळा डिजीटल करण्यात आल्या पण साकोळ येथील नागरीक व पालकांच्या उदासीन धोरणामुळे साकोळची शाळा काही डिजीटल झालेली नाही.
शाळेत लहान मुलांसाठी जेमतेम दहा बारा वर्ग खोल्या असून,त्या खोल्याची रंग रंगोटी करण्यासाठी गावातील प्रतिष्ठित व दानशूर व्यक्तीने स्वतःच्या मोठेपणासाठी शाळा व्यवस्थापन समितीकडे ब-यांच वेळा गावक-यासमोर स्पीकरवर नावे जाहीर केली पण जेव्हा पैसे देण्याची वेळ त्याच्यावर आली तेव्हा त्यांनी पळ काढला असल्याची चर्चा चौका चौकात सुरू असल्याचे स्पष्ट दिसत आहे.पैसे दयायचेच नव्हते तर मोठेपणाने नाव का सांगितले ?
याचे न उलगडणारे कोडे शाळा प्रशासनाला पडलेले आहे.असो बाकी किहीका होइना पाच वर्षाच्या चिमुकल्या मुलांनी आपल्या पालकांकडे हट्ट धरून स्वातंत्र्याच्या ७७ व्या दिनी ध्वजारोहण करून स्वतःच्या डिजीटल वर्ग खोलीची स्वतःच रिबीन कापुन साकोळवासीयांना एक अनोखा उपक्रम राबविण्यात आल्याचे सांगण्यात आल्यामुळे माधव भीमाशंकर भालके व त्यांचे वडील भीमाशंकर भालके यांचे शैक्षणिक,राजकीय, सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरीबद्दल नुतन शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष चंद्रकांत मुनाळे, उपाध्यक्ष इरफान शेख, मुख्याध्यापक अ गवशोक कारभारी तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारीवर्गासोबत सर्वत्र अभिनंदन होत आहे.
Discussion about this post