लोहा दि.13/01/2025 (प्रतिनिधी, हणमंत पांचाळ) दि.12 जानेवारी 2025 शहरात राष्ट्रमाता, राजमाता जिजाऊ जन्मोत्सव सर्वत्र आवडीने साजरा करण्यात आला.
शहरातील विद्यालय, शिवछत्रपती प्राथमिक व माध्यमिक विद्यालय जुना लोहा तसेच कै. विश्वनाथरावजी नळगे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय लोहा यांच्याकडून विविध देखाव्यासहित शहरातील मुख्य रस्त्याने मिरवणूक काढण्यात आली.
जन्मोत्सवामध्ये असंख्य प्रमाणात विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला विद्यार्थी सोबत पालक वर्ग पण मोठ्या प्रमाणात होता. लहान लहान चिमुकल्या विद्यार्थिनी राजमाता जिजाऊ यांचा वेशपरिधान करून मिरवणुकीमध्ये सहभागी झाले.
शहरातील नागरिकांनी उत्साह पूर्वक मिरवणुकीचे स्वागत केले. आणि सर्व विद्यार्थ्यांना उपहारपूर्वक खाऊचे वाटप केले.
Discussion about this post