शेती उपयोगी ट्रॅक्टर असल्याची परिवहन विभागात नोंदणी
समीर बल्की – तालुका प्रतिनिधी
चिमूर /भिसी : – दि. 11/01/2025 रोजी पो.स्टे. चिमुर, स्टे.डा. सान्हा क्र. 24/2025 प्रमाणे राकेश जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी चिमुर, यांचे सोबत पोहवा/786 गणेश नामदेव मेश्राम, चापोशि रमेश हाके, असे मिळून अवैध गौण खनिज वाहतुक कार्यवाही संबंधाने सरकारी वाहनाने रवाना होऊन, पंच नामे (1) तेजस अजय शिरभय्ये, वय 30 वर्ष, (2) शुभम हेमराज वजरे, वय-30 वर्ष, दोन्ही रा. वडाळा पैकु चिमुर, यांना हजारे पेट्रोल पंच चिमुर येथे पाचारण करुन, त्यांना अवैध गौण खनिज वाहतुक संबंधाने कार्यवाही करावयाची आहे. आपण पंच म्हणून सोबत राहावे असे कळवून पंचांना सोबत घेऊन पो.स्टे. चिमुर चे परीसरात पेट्रोलींग करीत असतांना दि. 12/01/2025 चे पहाटे 04/15 वा. दरम्यान चिमूर ते नेरी जाणाऱ्या रोडवर भुराजी देवस्थान टी पॉईन्टवर उभे असतांना एक विना क्रमांकाचा रेतीने भरुन असलेला ट्रॅक्टर ट्रॉलीसह भूराजी देवस्थान रोडने येतांना दिसल्याने त्यास थांबवून ट्रॅक्टर ट्रॉलीचे चालकाला आम्ही पंचासमक्ष नाव गाव विचारले असता,
त्याने आपले नाव मंदार जगदिश ढोणे, वय-22 वर्ष, जात-माना, धंदा-ड्रायव्हर, रा. शांती वार्ड नेरी, व त्याचे बाजुला बसलेल्या ईसमाने आपले नाव स्वप्निल विलास जिवतोडे, वय-20 वर्ष, जात-माना, धंदा-मजूरी, रा. शांती वार्ड नेरी, असे सांगीतल्याने, त्यांचे ताब्यातील ट्रॅक्टर ट्रॉलीची पंचासमक्ष पाहणी केली. फिर्यादी यांचे बयानवरुन सदरचा गुन्हा नोंद करुन अपराध क्रमांक. 09/202 5 कलम 303(2),3(5) B.N.S. मोवाका 130 (1),177 अन्वये दाखल करण्यात आहे.हे ट्रॅक्टर मालक भाजप चे कार्यकर्ते राकेश भोयर उर्फ ( धंम्मा ) राहणार वडाळा पैकू चिमूर आमदार किर्तीकुमार उर्फ बंटी भांगडिया यांचे निकटवर्तीय असल्याची चिमूर शहरात चर्चा रंगली आहे. या अगोदर सुद्धा अनेकदा यांचे ट्रॅक्टर रेती चोरीच्या गुन्ह्यात पोलीस स्टेशनला जप्त करण्यात आली होती.
Discussion about this post