प्रतिनिधी:- संतोष शिंदे
ए आर टी एम इंग्लिश स्कूलची विद्यार्थिनी ईरा राजेश होडबे इयत्ता पहिली हिने जनरल नॉलेज ओलंपियाड आणि मॅथ ओलंपियाड मध्ये उत्कृष्ट कामगिरी करत शाळेचे नाव उज्वल केले आहे.
तिला जनरल नॉलेज ऑलिम्पियाड आणि मॅथ ऑलिम्पियाड मध्ये सुवर्णपदक प्राप्त झाले असून ती पुढील फेरीसाठी निवडली गेली आहे.इराने मॅथ ऑलिम्पियाड मध्ये पैकीच्या पैकी गुण मिळवले असून तिची ऑल इंडिया रँक फर्स्ट आहे. सायन्स ऑलिम्पियाड फाउंडेशन कडून देण्यात येणाऱ्या विविध पारितोषिकासाठी पात्र ठरली आहे. या तिच्या यशाबद्दल शाळेचे संस्थाध्यक्ष श्री. पंकजजी तोष्णीवाल शाळेचे मुख्याध्यापक आर.वी. सुनील कुमार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला .
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन देविदास पुरी तर आभार अमोल घुगे यांनी मानले या यशाबद्दल सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा दिल्या.

Discussion about this post