कुरुंदवाड प्रतिनिधी/ शिरोळ तालुक्यातील कुरुंदवाड गावात भैरववाडी पुला शेजारील परिसरात तळीरामांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करून तळीराम गोंधळ घालत असल्याने सर्वसामान्य नागरिक हैराण झाले आहेत.
परिसरात देशी-विदेशीसह हातभट्टी दारूची अवैधरित्या राजरोसपणे विक्री केली जात आहे. दारू इथे सहज मिळत असल्याने तरुणवर्ग व्यसनाधीन झाला आहे. दारू पिऊन अनेकजण सार्वजनिक ठिकाणी गोंधळ घालण्याची चिन्हे दिसत असून, सर्वसामान्य नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. सबंधितांनी याकडे लक्ष देऊन अवैध दारूविक्री बंद करावी, अशी मागणी नागरिकांचे मधून होताना दिसत आहे मात्र, आजपर्यंत कोणतीही कारवाई झाली नसल्याने पोलीस प्रशासनाचे अभय मिळत असल्याचा आरोप नागरिकांच्यातून होत आहे . पोलिसांचे अभय मिळत असल्याने अवैध दारू विक्रेत्यांची मोठी चलती आहे. कोणाला संशय येऊ नये म्हणून पत्र्याच्या शेडमध्ये दारू विकत असल्याचे विदारक चित्र परिसरात पाहायला मिळत आहे.
याकडे पोलीस प्रशासनाकडून डोळेझाक होत असल्याने संताप व्यक्त होत आहे. कोल्हापूर पोलीस अधीक्षकांनी याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी परिसरात होत आह.
Discussion about this post