अपघातात महिला ठार अकस्मात मृत्यूची नोंद: सारथी महाराष्ट्राचा (प्रतिनिधी)



कोपरगाव औद्योगिक वसाहतीत कागदी पुठ्ठ्यांचे उत्पादन करत असलेल्या रिलायबल या कंपनीत काम करणाऱ्या गरिमा नगरी येथील महिलेचा पाण्याची टाकी अंगावर पडून अपघात होऊन त्या ती गंभीर रित्या जखमी झाली, असल्याने तिला उपचारार्थ कोपरगाव येथील ग्रामीण रुग्णालयात भरती केले असता, तेथील उपचार करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिला मृत घोषित केले असल्याची धक्कादायक बातमी हाती आली आहे
सदर कंपनी सुधाकर शेळके यांची असल्याची माहिती हाती आली आहे दरम्यान घटनास्थळी पोलीस उपनिरीक्षक भूषण हंडोरे यांच्यासह पोलीस हे.काॅ. जे . तमनर यांनी भेट दिली आहे. याबाबत कोपरगाव शहर पोलिसांनी आपल्या दप्तरी अकस्मात मृत्यू नोंद क्रमांक 06/2024 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 194 प्रमाणे नोंद केली आहे.
सदर मृत मुलीचे नाव शुभांगी संजय रोकडे वय 55 वर्ष असल्याची माहिती आहे. औद्योगिक वसाहतीत अनेक अपघात निष्काळजीपणाने होत असतात त्यात अनेकांचा बळी जात असतो असाच अपघात नुकताच कोपरगाव नजीक ईशान्य तीन कि .मी .अंतरावर असलेल्या औद्योगिक वसाहतीत रियरॅबल या कागदी पुठ्ठे बनवणाऱ्या कंपनीत घडला असून तेथे काम करत असताना दिनांक 10 जानेवारी रोजी सायंकाळी 6.15 वाजेच्या सुमारास सदर महिलेच्या अंगावर एक पाण्याची टाकी पडली आहे त्यात ती गंभीर रित्या जखमी झाली होती तिला नजीकच्या नागरिकांनी उपचार अर्थ कोपरगाव येथील ग्रामीण रुग्णात भरती केले होते ,मात्र तेथे उपचार करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिला मृत घोषित केले आहे
पुढील तपास पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांचे मार्गदर्शनाखाली पो.हे.काॅ. तमनर हे करीत आहेत.
Discussion about this post