लोणी काळभोर येथे विद्यार्थ्यांची हाणामारी लोणी स्टेशन परिसरात एका मोठ्या नामांकित शिक्षण संस्थेतील शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या टोळक्याने तिघांना दगडासह लाठी काठीने कपडे फाटेपर्यंत बेदम मारहाण केल्याची घटना सोमवारी ( दि. १३) दुपारी एक वाजण्याच्या सुमारास लोणी स्टेशन परिसरात असलेल्या इस्ट हेवन सोसायटीजवळ घडली आहे.
येथे असलेल्या संकुलात हजारो विद्यार्थी शिक्षण घेतात,तर काही विद्यार्थी संकुलाच्या वस्तीगृहात राहतात तर , काही विद्यार्थी संकुल च्या बाहेरच्या परिसरात भाडेतत्त्वावरील घेतलेल्या वस्तीगृहात राहतात.
ह्या परिसरातील हॉस्टेलमध्ये शेकडो विद्यार्थी राहतात. परिसरात क्रीओन प्री प्रायमरी स्कूल देखील आहे.
या शाळा दररोज दुपारी एक वाजण्याचा सुमारास सुटते. सोमवारी (दी.१३) दुपारी एक वाजण्याच्या सुमारास नेहमीप्रमाणे शाळा सुटली तेव्हा शाळेच्या जवळ असलेल्या इस्ट हेवन सोसायटी समोर विद्यार्थ्यांमध्ये दगडासह लाटी काठीने मारहाण सुरू झाली या घटनेमुळे शाळेतील लहान विद्यार्थी व शिक्षक, पालक वर्ग घाबरून गेला होता. सोमवारी घडलेल्या विद्यार्थ्यांच्या भांडणासंदर्भात कोणाची तक्रार आली नाही,
परंतु या विषयी माहिती घेऊन विद्यार्थ्यांना समज देण्यात येईल. विद्यार्थ्यांना समुपदेशन करण्यासाठी कार्यक्रम राबविण्यात येईल,
राजेंद्र करणकोट, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, लोणी काळभोर.
Discussion about this post