
प्रतिनिधी – राजेंद्र कदम
ज्योती म्हापसेकर यांना ‘एकता जीवन गौरव’ पुरस्कार’
ऑस्कर निवड समितीतील ज्युरी उज्वल निरगुडकर यांच्या हस्ते १८ रोजी गिरगाव साहित्य संघात गौरव
मुंबई एकता कल्चर संस्थेतर्फे देण्यात येणारे 2024 – 25 च्या वार्षिक पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. यात नाटककार तसेच स्त्री मुक्ती चळवळीच्या सक्षम योगदानाबद्दल ज्योती म्हापसेकर यांना या वर्षीचा एकता जीवन गौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. लेखिका डॉ. शामल गरुड, कवयित्री डॉ. योगिता राजकर, नंदलाल रेळे, कवी गीतेश शिंदे पत्रकार जगदीश भोवड तसेच दिनेश राणे, आनंद खरात यांचाही पुरस्कार प्राप्त नामवंतांमध्ये समावेश आहे. ज्येष्ठ कवी अजय कांडर, स्त्री मुक्ती चळवळीतील कार्यकर्त्या, कवयित्री योगिनी राऊळ आणि पत्रकार – कवी भगवान निळे यांच्या निवड समितीने यावर्षीच्या पुरस्कार विजेत्यांची एकमताने निवड केली आहे. 18 जानेवारी रोजी मुंबई गिरगाव येथील साहित्य संघात होणाऱ्या पुरस्कार सोहळ्यात सर्व पुरस्कार विजेत्यांना गौरविण्यात येणार असल्याची माहिती एकता कल्चर अकादमीचे अध्यक्ष प्रकाश जाधव यांनी दिली.
एकता कल्चर पुरस्कार सविस्तर माहिती पुढील प्रमाणे - 'स्त्री मुक्ती चळवळीतील' मान्यवर नेत्या ज्योती म्हापसेकर - (एकता जीवन गौरव पुरस्कार), नंदलाल रेळे - ध्वनी संकलन- उज्जय आंबेकर पुरस्कृत मधु आंबेकर स्मरणार्थ नटवर्य (भालचंद्र पेंढारकर स्मृती पुरस्कार), योगिता राजकर - साहित्य- कवी प्रकाश गणपत जाधव पुरस्कृत गणपत गुणाजी जाधव स्मरणार्थ (नारायण सुर्वे स्मृति पुरस्कार कविता संग्रह - बाईपण ), डॉ. शामल गरुड - साहित्य- (रजनी परुळेकर स्मृती विशेष पुरस्कार), नारायण गिरप - साहित्य - राजेश जाधव पुरस्कृत (काशिनाथ गणपत बेनकर स्मरणार्थ नारायण पेंडणेकर स्मृती पुरस्कार) ॲड. प्रियांका संदीप संगारे - विधि- मनोज संसारे स्मरणार्थ (संत जनाबाई स्मृती पुरस्कार), मनोज मस्के - नृत्य नीलांबरी उज्जय आंबेकर पुरस्कृत सहदेव बाबाजी लोखंडे स्मरणार्थ
(सुबल सरकार स्मृती पुरस्कार), अनुजा कासारे -शैक्षणिक – पल्लवी शिंदे माने पुरस्कृत कांचन रघुनाथ शिंदे स्मरणार्थ (सावित्रीबाई फुले स्मृती पुरस्कार), सुधाकर कदम – संगीत (पंडित कुमार गंधर्व स्मृति पुरस्कार), गीतेश शिंदे -प्रकाशक- रजनी संदीप बेनकर पुरस्कृत (यशवंतराव चव्हाण स्मृती पुरस्कार), जगदीश भोवड – पत्रकारिता – वैशाली बाळाराम कासारे स्मणार्थ (जयंत पवार स्मृती पुरस्कार), डॉ. रश्मीन केनिया-वैद्यकीय (डॉ. नितू मांडके स्मृती पुरस्कार) आदींना पुरस्कार घोषित करण्यात आले असून समाजसेवेचे पुरस्कार सर्वश्री आनंद खरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृती पुरस्कार, दिनेश राणे -प्रकाश पाटील पुरस्कृत महात्मा (ज्योतिबा फुले स्मृती पुरस्कार), विजय भगते – रमेश गणपत जाधव स्मरणार्थ (बाबा आमटे स्मृती पुरस्कार), विद्या दयानंद काट्रे – प्रियंका प्रकाश जाधव पुरस्कृत सुनंदा गणपत जाधव स्मरणार्थ (रमाबाई आंबेडकर स्मृती पुरस्कार), प्रकाश सोनावणे-नितीन कांबळे पुरस्कृत चंद्रमणी भिकाजी कांबळे स्मरणार्थ (संत गाडगेबाबा स्मृती पुरस्कार), किसन पेडणेकर – (सिंधुताई सपकाळ स्मृती पुरस्कार), अरुण सबनीस- गंगाधर म्हात्रे पुरस्कृत जनार्धन म्हात्रे स्मरणार्थ (बिरसा मुंडा स्मृती पुरस्कार), शरद जाधव- (भंन्ते महाथेरो स्मृती पुरस्कार), डॉ. अरुण भगत- (स्वामी विवेकानंद स्मुर्ती पुरस्कार) यांना जाहीर करण्यात आले.
'एकता महोत्सवात आंतरराष्ट्रीय ख्यातीचे, नॅशनल फिल्म हेरिटेज मिशन'चे सल्लागार व 'ऑस्कर अकादमीच्या निवड समितीतील ज्युरी उज्वल निरगुडकर यांच्या हस्ते सदर पुरस्काराचे वितरण शनिवार दिनांक १८ जानेवारी २०२५ रोजी सायंकाळी ४:०० वाजता गिरगाव येथील मुंबई मराठी साहित्य संघ नाट्यगृह येथे आयोजित करण्यात आलेल्या विशेष समारंभात एकता महोत्सवाचा सांगता सोहळा आणि पुरस्कार व पारितोषिके वितरण समारंभ संपन्न होणार आहे अशीही माहिती एकताचे उपाध्यक्ष उज्जय आंबेकर, एकताचे सचिव प्रकाश पाटील यांनी स्पष्ट केले आहे.
Discussion about this post