सावनेर प्रतिनिधी :सुर्यकांत तळखंडे
9881477824
सावनेर :स्वामी विवेकानंद यांची शिकवण तरुणांसाठी नेहमीच प्रेरणादायी ठरली आहे आणि भविष्यातही राहील त्यांच्या आयुष्यात अशा काही घटना घडल्या आहेत ज्या प्रत्येकासाठी एक धडा आहे. भारतीय अध्यात्म आणि तत्त्वज्ञानाची ओळख समर्थपणे संपूर्ण जगाला स्वामी विवेकानंद यांनी करून दिली.
युवकांसाठी स्वामी विवेकानंदांचे जीवन आणि विचार मार्गदर्शक ठरणारे आहेत.त्यांच्या विचार व कार्याचा युवकांनी आदर्श घेऊन समाजाच्या प्रगतीसाठी काम करण्याची गरज आहे.विवेकानंद जीवन चरित्र विविध भाषेत उपलब्ध आहेत युवकांनी हे चरित्र आत्मसात करावे असे आवाहन रामकृष्ण मठ नागपूरचे स्वामी ज्ञानगम्म्यानंद महाराज यांनी केले.विद्यार्थ्यांशी संवाद साधताना ते म्हणाले मानवी जीवनात विकासासाठी शिक्षणाचे महत्त्व, शिक्षणाचे तत्त्वज्ञान, राष्ट्र निर्मितीसाठी किती महत्त्वपूर्ण आहे हे सुद्धा स्वामी विवेकानंदांनी पटवून दिले आहे तरुणांना आणि विशेषतः विद्यार्थ्यांना त्यांनी काही धडे दिले आहेत त्यांच्या तील सात सवयी विद्यार्थ्यांनी अंगीकारल्यास यशाचा मार्ग सुकर करता येतो. ते स्थानिक भालेराव विज्ञान महाविद्यालयातील हॉल मध्ये स्वामी विवेकानंद यांच्या जयंती निमित्ताने समर्पण फाउंडेशनच्या वतीने युवा दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भालेराव सायन्स महाविद्यालयाचे प्राचार्य पराग निमिशे होते तर स्वामी ज्ञानगम्यानंद महाराज प्रमुख वक्ते होते.
समर्पण फाउंडेशनचे अध्यक्ष ॲड.अभिषेक मुलमुले, तुषार उमाटे, सोनू नावदिंगे,डॉ.विलास मानकर, डॉ. दाते, मंदार मंगळे, प्रविण नारेकर, विनोद बागडे, अभिषेक गहरवार, ॲड. अन्वेषा मुलमुले, डॉ वैशाली दाते, सोनाली उमाटे, आदी पदाधिकाऱ्यांसह प्राध्यापक वर्ग शिक्षक वृंद व विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मान्यवरांनी स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पुजन करून अभिवादन केले स्वामींच्या जीवन चरित्रावर प्रकाश टाकला.
बातम्या व प्रतिनिधी होण्यासाठी
संपर्क .7744922000

Discussion about this post