
येत्या पंधरा दिवसांत संसदेत अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरूवात होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर येत्या अधिवेशनात मी संपूर्ण महाराष्ट्राच्या रेल्वे विकासाचे प्रश्न जोरकसपणे मांडणार आहे. मी राज्यसभेचा खासदार आहे. आणि महाराष्ट्रातून राज्यसभेत प्रतिनिधित्व करित आहे त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राच्या रेल्वे विकासासाठी प्रयत्न करणार आहे. त्यात प्रामुख्याने काही गाड्या सुरू करणे असो काही नवीन लोहमार्ग, दुहेरीकरण, ॲटोमॅटीक ब्लॉक सिग्नल यंत्रणा असो की कवच यंत्रणा असो हे सर्व प्रश्न टप्प्याटप्प्याने मांडणार आहे. त्यात प्राधान्याने
१) पंढरपूर – पुणे-मुंबई दररोज एक्सप्रेस सुरू करणे
२) पटना-पूर्णा एक्सप्रेसचा विस्तार छ. संभाजीनगर पर्यंत करणे
३) संत्रागाछी – नांदेड एक्सप्रेसचा विस्तार छ. संभाजीनगर पर्यंत करणे
४) मुंबई – जालना वंदे भारत एक्सप्रेसचा विस्तार परभणी मार्गे नांदेड पर्यंत करणे
५) सिकंदराबाद – नांदेड-छत्रपती संभाजीनगर नवीन वंदे भारत एक्सप्रेस सुरू करणे
६) नांदेड-छत्रपती संभाजीनगर – पुणे वंदे भारत एक्सप्रेस
७) रायचूर-परभणी एक्सप्रेसचा विस्तार छ. संभाजीनगर पर्यंत
८) अकोला-पूर्णा एक्सप्रेसचा विस्तार छ. संभाजीनगर पर्यंत
९) जालना-नांदेड-तिरूपती दररोज पुष्करिणी एक्सप्रेस सुरू करवून घेणे
१०) सोलापूर – लातूर-नांदेड-नागपूर द्विसाप्ताहिक एक्सप्रेस
अशा काही गाड्यांसह रेल्वे इन्फ्रास्ट्रक्चर विकासासाठी प्रयत्न करेल त्यात प्रामुख्याने
१) परभणी-छत्रपती संभाजीनगर (१७७ किमी) लोहमार्ग दुहेरीकरणाला मंजुरीसह भरघोस निधी मिळवून घेणे
२) नांदेड रेल्वे विभागात मेमू कारशेड आणि इलेक्ट्रिक लोकोशेड मंजुरी
३) बोधन-बिलोली-लातूररोड
४) नांदेड-देगलूर-बिदर
५) नांदेड-लोहा-राजुर-लातुररोड
६) नांदेड-यवतमाळ-वर्धा
या सर्व नवीन लोहमार्ग मंजूरी
अशा कामांसाठी जोरदार पाठपुरावा करेल. एकूणच महाराष्ट्राने खासकरून मराठवाड्यातील सर्व रेल्वे संघटनांनी एकीचे बळ दाखवून मराठवाड्याच्या रेल्वे विकासासाठी सोबत यावे असे आवाहन मी करित आहे.
Discussion about this post