नूतन माध्यमिक विद्यालय कापडणे येथे एमकेसीए( MKCL) उत्तर महाराष्ट्र विभाग आणि रोटारेक्ट डिस्ट्रिक्ट 3060 च्या संयुक्त विद्यमाने ऑगस्ट 2024 या महिन्यात स्वतंत्र दिनानिमित्त प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
या स्पर्धेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला तर या मध्ये नूतन माध्यमिक विद्यालयातील इयत्ता 10 वी विद्यार्थिनी साक्षी दीपक माळी हिचा प्रथम क्रमांक आला तर इयत्ता 9वी ची विद्यार्थिनी राधिका प्रवीण माळी या विद्यार्थ्यांचा द्वितीय क्रमांक आला. तर 10 चा विद्यार्थी मुकेश दिलीप बडगुजर या विद्यार्थ्यांच्या तृतीय क्रमांक मिळाला.
या परीक्षेत ओम साई कॅम्पुटर सेंटर चे संचालक जगन्नाथ साहेबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा घेण्यात आली होती. व त्यांच्या हस्ते या तीनही यशस्वी विद्यार्थ्यांना मेडल व प्रमाणपत्र वितरण करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या वेळी शाळेचे मुख्याध्यापक डी.पी.माळी, शिक्षक एस.पी.एंडाईत,ए.डी.पाटील,बी.ए.माळी,एस.सी.महाजन,व्ही.डी.शिरसाठ,के.एल.ठाकरे,पी.सी.धनगर,व्ही.आर.माळी,डी.डी.सोनवणे,जी.एस.कुवर,महेंद्र मनोहर माळी,तसेच शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
Discussion about this post