लोहा, (प्रतिनिधी हणमंत पांचाळ) पंचायत समिती लोहा तर्फे रत्नाकर पाटील ढगे यांचा सत्कार…!
बायो ऊर्जा व सेंद्रिय शेती मध्ये उत्तम कार्य केल्या बदल महामहीम राष्ट्रपती यांनी २६ जानेवारी २०२५ रोजी प्रजासत्ताक दिन कार्यक्रमाचे दिवशी राष्ट्रपती भवन येथे निमंत्रित केल्याबद्दल सायाळ येथील युवा प्रगतीशील शेतकरी रत्नाकर गंगाधर पाटील ढगे यांचा पंचायत समिती कार्यालय लोहा यांच्या वतीने लोहा पंचायत समितीचे कृतव्यदक्ष गटविकास अधिकारी आडेराघो यांच्यावतीने यथोच्छित सत्कार करण्यात आला.
या वेळी पंचायत समितीचे कृषी विकास अधिकारी शैलेश वावळे, विस्तार अधिकारी पाठक, देशपांडे, टेबुर्णे, महेत्रे, परशुराम वाडीकर, सुतार मँडम विस्तार अधिकारी पंचायत समिती लोहा हनुमंत पवार सायाळकर पत्रकार गणपत जामगे यांची उपस्थिती होती.
यावेळी मनोगत व्यक्त करताना रत्नाकर पाटील ढगे यांनी सांगितले की, देशाच्या सवोच्च अशा राष्ट्रपती भवनातील कार्यक्रमात मला बोलावून मातीत काम करणाऱ्या शेतकरी बांधवाचा सन्मान करण्यासाठी देशाची राजधानी दिल्लीत बोलविण्यात येत असल्याने महामहिम राष्ट्रपती यांचे जाहीर आभार मानतो व यापुढे शेतीमध्ये भरीव कार्य कारण्याचा मी संकल्प केला आहे असे रत्नाकर पाटील ढगे यांनी सांगितले.
Discussion about this post