वैभववाडी येथील महाराणा प्रतापसिंह शिक्षण संस्था संचलित आनंदीबाई रावराणे महाविद्यालयात “वाचन संकल्प महाराष्ट्राचा” या राज्य शासनाच्या उपक्रमांतर्गत महाविद्यालयात १ जानेवारी ते १५ जानेवारी २०२५ या कालावधीत विविध उपक्रम घेऊन वाचन संकल्प उपक्रम साजरा करण्यात आला. यामध्ये स्कूल-कनेक्ट कार्यक्रमांतर्गत कै.हेमंत केशवराव रावराणे जुनियर कॉलेजचे विद्यार्थी व शिक्षक यांच्यासाठी ग्रंथ प्रदर्शन आणि प्रबोधनात्मक व्याख्यानाचा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी वैभववाडीतील साहित्यिकांची माहिती व ग्रंथांचे महत्त्व प्र. प्राचार्य डॉ.एन.व्ही. गवळी यांनी विद्यार्थ्यांना दिली. तसेच लेखक आपल्या भेटीला यांचाही परिचय करून देण्यात देण्यात आला. बहुसंख्य विद्यार्थ्यांनी ग्रंथ प्रदर्शनाचा लाभ घेताना पुस्तक हे मस्तक घडविते याचा आनंद घेतला. यावेळी महाविद्यालयातील व रावराणे कनिष्ठ महाविद्यालयातील सुमारे दीडशे विद्यार्थी व प्राध्यापकांनी लाभ घेतला.
Discussion about this post