प्रतिनिधी:- सुरेश अंधारे
गेल्या एकोणीस वर्षांपासून नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव जलाल येथील जय भवानी सामाजिक , सांस्कृतिक संस्था व जिल्हा प्राधिकरणाच्या वतीने सायकल यात्रेचे आयोजन करण्यात येत असून या यात्रेदरम्यान सामाजिक संदेश देत कायदेशीर मार्गदर्शन करण्यात येत आहे या यात्रेचा तरुणांनी आदर्श घेऊन सामाजिक कामाबरोबरच आपल्या आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन नगर दक्षिण चे लोकप्रिय खासदार मा. श्री नीलेशजी लंके यांनी केले. ही यात्रा पिंपळगाव जलाल येथुन १२ जानेवारी २०२५ पासून सुरू झाले आहे. ही यात्रा आहिल्यानगर मार्गे तुळजापूर, अकल्लकोट, गाणगापूर कडे निघालेली ही यात्रा आहिल्यानगरमध्ये पोहचल्यानंतर खासदार साहेबांनी या यात्रेचे आहिल्यानगर येथे स्वागत केले व पुढील प्रवासासाठी सर्वांना शुभेच्छा दिल्या. या यात्रेत तीस सायकल स्वार सहभागी झाले असून त्यात एक पुरुष व एक महिला न्यायदीश यांचाही समावेश आहे. ७८ ते ६८ वर्षांचे सेवनिवृत्त शिक्षक आणि शिक्षिका दोन सेवानिवृत्त फौजी सहभागी आहेत. आजच्या यात्रेत या सर्वांनसोबत लंके साहेबांनी सायकल स्वार होऊन काही अंतर सहभागी झाले होते या सायकल यात्रेचा इतरांनाही आदर्श घेऊन सामाजिक कामात सहभाग नोंदवा आसे आव्हानही त्यांनी या वेळी केले. नगरमध्ये शिक्षण घेत असताना मी नगर ते भिंगार असा सायकल प्रवास करीत असे. या सायकल यात्रेचा निमित्ताने जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. सायकल शिकताना आणेकदा पडलो गुडघे फुटले या आठवणीही लंके यांनी या यात्रेत सहभागी होऊन संवाद साधताना सांगितल्या. या यात्रेत एक फलक लक्षवेधी ठरत आहे, “भांडणा पेक्षा समझोता बरा, त्यातच आनंद आहे खरा!” अन्यायाला जेथे वाचा फोडे तेथे तेथे, साधता संवाद संपतील वाद, न्याय सबके लिये आदी फलक हे लक्ष वेधून घेत आहे. मेजर युवराज गांगावे आणि दत्ता भाऊ गांगवे देश सेवा करून सेवनिरुत्त झाल्या नंतर सामाजिक, सामाजिक कामात कायमच निःस्वार्थ पणे काम करीत असतात.या यात्रेत न्यायाधीश डॉ. विक्रम आव्हाड, डॉ. संगीता आव्हाड,जय भवणी समजिक व सांस्कृतिक प्रतिष्ठान चे अध्यक्ष श्री. विजय भोरकडे, गणेश भोरकडे, नवनाथ भोरकडे, रोहित पाटील, किशोर खोकले, विशाल खोकले, बाळासाहेब बनकर, साईनाथ गायकवाड आदी सहभागी झाले आहे. खासदार यांचे सहकारी नगरसेवक योगीराज गाडे, राहुल झावरे उपस्थित होते त्यांच्या या सायकल यात्रेला खूप खूप शुभेच्छा..
Discussion about this post