भारत कवितके मुंबई कांदिवली पश्चिम.शुक्रवार दिनांक १० जानेवारी २०२५ आणि शनिवार दिनांक ११ जानेवारी २०२५ रोजी नाशिक पंचवटी येथे गिरणा गौरव प्रतिष्ठान व्दारा दोन दिवसीय अखिल भारतीय शेकोटी लोककला साहित्य संमेलनाचे आयोजन जेष्ठ उद्योगजक देवकिशनजी सारडा साहित्य नगरी, भावबंधन मंगल कार्यालय,राका लान्स समोर, पंचवटी नाशिक या ठिकाणी आयोजित करण्यात आले आहे.
दोन दिवस रात्र आणि दिवस चालणाऱ्या भरघोस कार्यक्रमात श्री सत्यनारायण पूजा, ग्रंथ दिंडी, शेकोटी लोककला साहित्य संमेलनाचे उद्घाटन, पोवाडा सादरीकरण, लावणी स्पर्धा, मान्यवरांचे मनोगत मध्ये जाऊ कवितेच्या गावा, तमाशा, शेकोटी संमेलन, जागरण गोंधळ,तळी भरणे, अहिराणी कवी संमेलन, गझल संमेलन, बालकवी संमेलन, परिसंवाद, निमंत्रित कवी संमेलन, नाशिक जिल्ह्यातील लोककलांचा कृतज्ञता सोहळा, स्मिता पाटील शब्द पेरा साहित्य पुरस्कार प्रदान सोहळा, सांस्कृतिक कार्यक्रम, परिसंवादामध्ये साहित्यातील डिजिटल युग संधी की आव्हाने ?
स्त्री साहित्य प्रेरणा की उपहास? कलावंताचा सत्कार, निळूभाऊ फुले वाड:मय साहित्य पुरस्कार, आणि समारोप अशा भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
शेकोटी लोककला साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष अड.नितीनभाऊ ठाकरे, संमेलनाचे अध्यक्षा प्रा.सुमती पवार, उद्घाटक रघुवीर खेडकर आणि विशेष अतिथी माधुरी पवार ( लावणी सम्राज्ञी) शिवकन्या बढे (ढोलकी साम्राज्ञी) वसंतराव जगताप (अध्यक्ष तमाशा महोत्सव) योगेश चिकटगावकर ( लोक कलावंत).
असणार आहेत.स्वागतोत्सुक रविंद्र मालुंजकर,किरण सोनार,व संजय आहेर असणार आहेत,सदर दोन दिवस चालणाऱ्या शेकोटी लोककला साहित्य संमेलनाचे आयोजक गिरणा गौरव प्रतिष्ठान व गिरजा महिला मंच पदाधिकारी व सदस्य हे आहेत.
Discussion about this post