🏻 पियूष गोंगले गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी
📲9423170716
एटापल्ली – स्थानिक एटापल्ली येथील भगवंतराव कला व विज्ञान महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभाग द्वारा युवा माझ्या भारतासाठी , युवा डिजिटल साक्षरतेसाठी या संकल्पनेवर महाविद्यालयीन विशेष श्रमसंस्कार शिबिराचे आयोजन दि. ११ जानेवारी ते १७ जानेवारी २०२५ पर्यंत तालुक्यातील एकरा बु. येथे आयोजित करण्यात आले आहे. या शिबिराचे उद्घाटन दिनांक १२ जानेवारी २०२५ रोजी करण्यात आले. या शिबिराचे उद्घाटक श्री राघव सुल्वावार, बांधकाम सभापती नगरपंचायत एटापल्ली यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष एकरा गावाचे पोलीस पाटील श्री. साधूजी दुर्वा हे. होते तर प्रमुख अतिथी म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. एन. बुटे , नगरसेवक श्री. राहुल कुळमेथे, पत्रकार श्री विनोद चव्हाण, प्रा. डाॅ. सुधीर भगत, प्रा. डॉ. बाळकृष्ण कोंगरे, प्रा. डॉ. शरदकुमार पाटील,प्रा. डाॅ. राजीव डांगे, प्रा भारत सोनकांबळे, प्रा. अतुल बारसागडे उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन सहाय्यक रासेयो कार्यक्रम अधिकारी डॉ. श्रृती गुब्बावार यांनी तर प्रास्ताविक रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. संदीप मैंद यांनी केले व कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला
Discussion about this post